Friday, 9 January 2026

जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

 जनऔषधीक्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

 

 क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर मिशन मोडमध्ये विशेष रणनीती राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच तपासणी मोहीम व्यापक करणेउपचारांमध्ये सातत्य राखणे आणि रुग्णांना पोषण सहाय्य देणेनिक्षय मित्र यांचे मार्फत फूड बास्केट देणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. राज्यातील क्षय रोगाच्या रुग्णांची एक्स-रे तपासणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. केंद्र शासनामार्फत 96 अतिरिक्त हॅन्ड हेल्ड एक्स-रे मशीन राज्याला देण्यात येणार आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना गती देत लोकाभिमुखसक्षम आणि विश्वासार्ह आरोग्य व्यवस्था उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक प्रभावी बनविण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वाची ठरली आहे. सदर बैठकीसाठी आरोग्य मंत्री यांचे सोबत आरोग्य सचिव इ रवींद्रनसंचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर उपस्थित होते.

000

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi