शीला, गाव: जानेफळ, तालुका जाफराबाद, जि. जालना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभिनंदन केले आहे. तसेच या कार्यक्रमाच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. प्रोजेक्ट सुविता टीमचेही कौतुक करण्यात आले असून, शासनाने भविष्यातही या भागीदारीतून राज्यातील लसीकरण ९५ टक्के पेक्षा अधिक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
‘प्रोजेक्ट सुविता’ हा उपक्रम म्हणजे तंत्रज्ञान, वर्तनशास्त्र आणि आरोग्यसेवा यांचा संगम आहे. या कार्यक्रमामुळे पालकांचे ज्ञान, सहभाग आणि आरोग्य प्रणालीवरील विश्वास वाढला असून, महाराष्ट्राने पुन्हा एकदा डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय नेतृत्व सिद्ध केले आहे
No comments:
Post a Comment