शेजारच्या घरातून साजूक तूप-जिऱ्याच्या फोडणीचा सुगंध येत होता. कॅलेंडरमध्ये पाहिलं. आज चतुर्थी आहे हे समजलं. मग मी एक मध्यम आकाराचा डबा घेतला. त्यात अर्धा डझन केळी घालून शेजारच्या काकूंकडे गेलो. गावाकडची स्पेशल गावठी केळी खास तुमच्यासाठी आणलीत असं सांगितलं. तब्बेतीची चौकशी केली. काकू बारीक दिसत आहेत असंही सांगितलं. काकू खुश झाल्या. घरी परतलो आणि सोफ्यावर पाय पसरून फेसबुक वाचू लागलो. अपेक्षेप्रमाणे पाचच मिनिटात बेल वाजली. मी आनंदाने दार उघडलं. काकू डबा परत द्यायला आल्या होत्या! मी स्मितहास्य करत डबा घेतला. दार बंद करून खमंग साबूदाणा खिचडी खायला सज्ज झालो. डबा उघडताच निराश झालो. काकूंनी दोन मोठी उकडलेली रताळी घालून डबा परत केला होता. कोकणातील युक्त्या पुण्यात चालत नाहीत याचा पुनःप्रत्यय मिळाला.
एका नव्याने पुण्यात गेलेल्या कोकणी माणसाची व्यथा
😂😂😂
No comments:
Post a Comment