महाविद्यालयातील प्रत्येक खेळाडूची ‘भारत स्पोर्ट्स पोर्टल’ वर नोंदणी व्हावी
महा-देवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करा
-राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे
मुंबई, दि.15 : राज्यातील सर्व विद्यापीठांअंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रत्येक खेळाडूंची भारत स्पोर्ट्स पोर्टल वर नोंद करून महा-देवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करण्याचे निर्देश राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.
'लोकभवन' येथे महा-देवा प्रोजेक्ट तसेच इतर खेळांच्या प्रगतीसंदर्भात राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यपालांचे उपसचिव राममूर्ती, लोकभवनमधील सह संचालक (वै. वि. मं.) विकास कुलकर्णी तसेच दूरदृश्यप्रणाली द्वारे सर्व विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment