Wednesday, 12 February 2025

कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता

 कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता

- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

क्रीडा गणवेश दर्जाक्रीडा मार्गदर्शक मानधन,

प्रशिक्षणार्थी भोजन दरात वाढ करण्याचा निर्णय

 

            मुंबईदि. 12 :- शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडीपुणे येथे खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत कराव्यातकाही सुविधा आवश्यतेनुसार नव्याने कराव्यात,असे निर्देश देत गणवेश दर्जाप्रशिक्षक मानधनभोजन दरात वाढ करण्याचा तसेच फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शिवछत्रपती क्रीडापीठ उच्चस्तर धोरण समितीची बैठक झाली. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओलक्रीडा विभागाचे सहसचिव मंगेश शिंदेक्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरेउपसंचालक सहास पाटीलनवनाथ फडतारे उपस्थित होते.

क्रीडा मंत्री भरणे म्हणाले कीमहाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडविणेराज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षणसंतुलित आहार देणेअद्ययावत क्रीडा सुविधा देणे त्याचबरोबर क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने शिवछत्रपती क्रीडापीठम्हाळुंगे-बालेवाडीपुणे येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे हा हेतू साध्य करत महाराष्ट्राच्या लौकीकाला साजेसे काम या क्रीडापीठाच्या माध्यमातून झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक मदत करण्यास शासन तत्पर आहे. शिवछत्रपती क्रीडापीठपुणे व राज्यातील क्रीडा प्रबोधिनींचे व्यवस्थापनदेखभाल दुरुस्तीनवीन कामे करताना सूक्ष्म नियोजन करून कामाचा दर्जागुणवत्ता कायम राखावीअसेही निर्देशही दिले.

कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता

            क्रीडा मंत्री भरणे म्हणालेकोल्हापूर कुस्तीसाठी प्रसिध्द आहे. याबरोबरच आता फूटबॉल खेळासाठी देखील कोल्हापूर प्रसिध्द होत आहे. या ठिकाणी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी असावी अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीचाफुटबॉल खेळाडूंचाफुटबॉल प्रेमींचा आदर करुन कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट करत या निर्णयामुळे फूटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळणार असून नामवंत खेळाडू घडण्यासाठी ही प्रबोधिनी उपयुक्त ठरेलअसा विश्वासही क्रीडा मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi