Thursday, 21 August 2025

२९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सवाचे

 क्रीडा दिनानिमित क्रीडा महोत्सवाचे राज्यभर आयोजन

 

मुंबई, दि. २० : क्रीडा दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात राज्यभर विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी कार्यप्रणाली तयार करण्यात यावी. त्यासाठीचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी दिली.

पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.  या महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त शितल तेली, उपसचिव सुनील पांढरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील क्रीडा अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले कीकेंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाच्या धर्तीवर नवे क्रीडा धोरण तयार करण्यात यावे. तसेच राज्यातील खेळाडूंच्या अपेक्षेप्रमाणे बदल करावे. क्रीडा महोत्सवात जिल्हा तसे तालुकास्तरावर विविध क्रीडा कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करावे. शाळा महाविद्यालय विद्यापीठांना तसेच जिल्ह्यातील क्रीडापटूंना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना अभिवादनफिट इंडिया शपथ आणि ६० मिनिटे संघ खेळ व विरंगुळ्याचे खेळ आयोजित करावे.

३० ऑगस्ट रोजी स्थानिक/आदिवासी खेळइनडोअर स्पोर्ट्सशाळा/महाविद्यालय स्तरावरील क्रीडावादविवादफिटनेस व्याख्यानेक्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. ३१ ऑगस्ट रोजी Sundays on Cycle या उपक्रमात देशभरातील नागरिकांचा सहभाग करून उपक्रम राबवावा.

या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात दोर  खेचणे (Tug of war), ५० मी. शर्यतरिले रेसमॅरेथॉनचमच्यातील गोळी शर्यतगोणपाट शर्यतयोगक्रिकेटसायकलिंगपिट्ठू सारखे स्थानिक खेळखो-खोकबड्डीव्हॉलीबॉलदोरीवर उड्या मारणेबुद्धिबळऑलिंपिक मूल्य शिक्षण कार्यक्रम  तसेचज्येष्ठ नागरिकांसाठी ३०० मी. स्पीड वॉक१ किमी वॉकयोगश्वसनाचे व्यायामसांध्यांचे व्यायामस्ट्रेचिंग चॅलेंजसायकलिंग या क्रीडा प्रकाराचा सहभाग करावा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi