झोपडपट्ट्यांमधील पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करा
जिल्ह्यातील नगरपालिका / महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करावे. 2011 पूर्वीच्या घरांना नियमित करुन त्यांना सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पट्टे वाटप करण्यात यावे. याअनुषंगाने नागपूर येथे झालेल्या कामाची माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारातील बाबींवर तातडीने निर्णय घ्यावा तसेच जी प्रकरणे शासनाकडे पाठविणे आवश्यक असेल ते प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असेही मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment