Thursday, 21 August 2025

समृद्धी महामार्गासाठी जो दर देण्यात आला त्याचा अभ्यास करुन तो दर देणे शक्य

 महसूलमंत्री श्री.बावनकुळे म्हणालेसमृद्धी महामार्गासाठी जो दर देण्यात आला त्याचा अभ्यास करुन तो दर देणे शक्य आहे का ते पाहावेअथवा रेडीरेकनरच्या दरानुसार अधिसूचनेच्या आधीच्या तीन वर्षात खरेदीखताचा जो सर्वाधिक दर असेल तो गृहीत धरुन त्यावर प्रतिवर्षी १० टक्के वाढ करावी. या दोन्ही पर्यायांपैकी जो दर शेतकऱ्यांना मान्य असेल त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा. जालना शहराजवळील ज्या जागांचे बाजारभाव अधिक असतील त्यांना सानुग्रह अनुदान देता येईल का ते तपासून पाहण्याची सूचनाही त्यांनी केली. त्याबरोबरच फळबागा आणि घरांच्या भरपाईचा आराखडा तयार करण्यात यावाअसेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi