समृद्धी'च्या धर्तीवर नांदेड-जालना मार्गासाठी
मोबदला देण्याच्या पर्यायाचा विचार करावा
-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. २० : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नांदेड-जालना द्रुतगती मार्गासाठीही जमीन संपादनाचा मोबदला निश्चित करण्याच्या पर्यायाचा विचार केला जावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
जालना जिल्ह्यातील भूसंपादनाबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. तर आमदार सर्वश्री अर्जुन खोतकर, नारायण कुचे, कैलास गौरंट्याल यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीत समृद्धी महामार्गासाठी जमीन मूल्यांकन, झाडे व घरांची नुकसान भरपाई आणि झोपड्यांचे नियमितीकरण आदी मुद्यांवर देखील चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment