Sunday, 1 October 2023

डीजे वाले बाबु -मला अंध नका कर, हृदय कमकुवत नका कटू

 

डीजे वाले बाबु -मला अंध नका करु  ........  

कालच अनंत चतुर्दशी आनंदात पार  पडली आपल्या लाडक्या गणरायाला आपण आनंदात विसर्जित केलं. ढोल ताशा आणि हा! आत्ता सध्या  D J च्या  ट्रेण्डिंग  गजरात आपण नाचत, थिरकत गणपती बाप्पा ला निरोप दिला !


दुसर्‍याच दिवशी मी'नेहमी प्रमाणे ओपीडी मध्ये नेत्ररोगाचे रुग्ण पाहू लागलो .

थोड्या वेळात ;एक विशीतला तरुण काल  अचानक दिसायला कमी झालं म्हणून आला. प्रार्थमिक तपासणी करून बघितला तर त्याची नजर खूपच कमी झाली होती मग डोळ्याचे pressure घेऊन त्याला नेत्रपटल तपासणी साठी घेतले.  बघतो तर काय त्याच्या नेत्रपटलावर खूप मोठे रक्त साखळे होते आणि नेत्रपटलावर भाजल्या सारख्या जखमा आढळल्या. 


 नेहमी प्रमाणे वाटणारा हा आजार नव्हता याची मला जाणीव झाली मग फेर हिस्टरी तपासणीत त्याला विचारलं कि काही मार लागला होता का? , किंवा तू काही ग्रहण बबघितले का? ,कि कुठे वेल्डिंग बघितले? तर यातील काहीच पॉसिटीव्ह नव्हते . खोलवर विचार केल्या  वर त्याने सांगितलं कि काल मिरवणुकीत नाचलो आणि D J वर लेसर शो बघितला . 


मग मनात पाल चूक चूक ली आणि लेसर शो चा लेसर बर्न रेटिना वर असल्याची खात्री पटली.

 

मग रेटिनाचा O C T स्कॅन करून माझं निदान कन्फर्म केलं .पुढील दोन तासात असेच आजून दोन रुग्ण आलेत त्यांना पण रेटिना वर याच प्रकारचे चित्र दिसले. 


मग मात्र मी आमच्या नेत्र रोग संघटनेच्या माध्यमातून विचारपूस केली असता अजून दोन हॉस्प्पिटल ला असेच रुग्ण आहेत असे निदर्शनात आले.


बापरे! म्हणजे ५ च्या वर तरुण एकाच दिवशी DJ लेसर शो चे शिकार झालेले पहिले. यातील बरेच जण अजून कदाचित रिपोर्ट झालेले नसतील किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्ट चे असतील.  

हा आकडा याहून जास्त प्रमाणात असावा

नेत्रपटलावर आम्ही या प्रकारचे लेसर बर्न क्वचितच बघितले असावेत. 


 हा काही तरी भलताच प्रकार समोर आला आणि जनजागृती साठी हा पत्रप्रपंच केला. 


मग प्रश्न पडला कि, ठराविक लोकांनाच असे का झाले. याचा खोलवर अभ्यास केला आणि कळाले कि या green लेसर चे frequency खूप जास्त होती आणि जे युवक त्या लेसर च्या frequency च्या फोकल लेंग्थ वर आलेत किंवा त्यांचे नेत्रपटल आले त्यांनाच हे प्रकार घडले. 



आपण लहानपणी भिंग घेऊन ज्या प्रमाणे ऊन्हात कागद पेटवायचो तसाच  प्रकार या लेसर ने या तरुणाई वर केला होता.


असल्या लेसर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाही तर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीत दिसतील आणि कित्येक निष्पाप लोकांची नजर यात जाईल . आपल्या कडच्या भाऊ ,दादा आणि राजकारणी चमको गिरी साठी वापरण्यात येणाऱ्या DJ लेसर चा इतका वाईट परिणाम सामान्य नागरिकांवर होईल याची यत् किंचित कल्पना पण करवत नाही. 


या सगळ्या तरुणांना आणि तरुणींना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या कॅर्रीयर साठी किती भयावह असेल?  यातील बरीच मंडळी ऊच्च शिक्षण घेणारी होती. 


प्रशाशनाला याची दखल घ्यावी आणि वेळीच हा प्रकार थांबावा 


नाहीतर लातूरच्या अंनत चतुर्दशीच्या भूकंपा प्रमाणे अंधत्वाचा भूकंप आपली वाट बघत आपल्या तरुण पिढीचा घास घेईल.


लेखक

डॉक्टर गणेश भामरे (रेटिना स्पेशालिस्ट )

डॉक्टर सचिन कासलीवाल (नेत्ररोग तज्ज्ञ )


जनहितार्थ 

नाशिक नेत्ररोग तज्ञ संघटना

[लक्षवेधी मास मीडिया : 😇🤔🫲🖐️✊ok मी पण ह्यावर human right commission la apply करते,मिरवणूक, वराती हॉस्पिटल रस्त्यावरून जातात तेव्हा छोटी बालके,आजारी,वृद्ध, माणसांना सहन होत नाही अवजाचे दणके,हृदयात कल येते, कानाचे पडदे phàtail ,सहन होत नाही,वर्गणी देतानाच त्यांना कल्पना द्यावी सर्व सोसायटी ने ठराव करावा,नगरसेवकांना ही अट सांगावी. सुधारणा आरोग्याशी निगडित असेल तर सर्वांनीच आवाज उठवला पाहिजे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi