भरलेली
शाही वांगी
साहित्य - १० ते १२ छोटी निळी वांगी, १ नारळाचे ओले खोबर, २ कांदे, गरम मसाला पावडर,
काळा खजूर, मनुका, काजूचे तुकडे, कोकम, तमालपत्र, गुळ/साखर, मिठ
कृती - प्रथम वांगी धुवून पुसून घेणे. जिर, हिंग फोडणीला टाकणे, कांदा चांगला परतवुन घेणे
त्यामध्ये ओले खोबरे टाकून खमंग भाजून घेण त्यामध्ये गरम मसाला व मिठ टाकणे. नंतर खोबरं
वाटून घेताना साखर/गुळ, कोकम टाकून वाटून घेणे. वाग्यांचे देठ तसेच ठेवून चार काप करून (देठासहीत) वाटलेले
मिश्रण त्यात भरणे. त्यात काजू, खजूर, मनुका
भरणे.
त्यानंतर
फोडणीला हिंग, जिर व तमालपत्र टाकून कांदा परतविणे. परतवलेल्या मिश्रणात भरलेली वांगी
मंद अग्नीवर वाफविणे.
ही
भरलेली शाही वांगी ४ ते ५ दिवस राहतात व चविष्ठ ही लागतात.
No comments:
Post a Comment