ही पाककृति सन १९८० पर्यंत सर्रास ग्रामीण भागात लग्न व पुजा व इतर धार्मिक
समारंभ वेळी केली जात असे. शक्यतोवर गुळाचा वापर जास्त असायचा. फक्त शहरी भागात साखर
भात कार्यक्रमप्रसंगी असायचा. आता ही पाककृति ग्रामीण व शहरी भागातूनही गायब झाली आहे.
आता तिची जागा उत्तर भारतीय गुलाबजामुन, जिलेबी
हयांनी घेतली आहे. पुनश्च महाराष्ट्रीयन पाककृति रुजवा.
गोड भात
साहित्य - अर्धा किलो गुळ/साखर, ओले खोबरे १ नारळ, अर्धा किलो तांदुळ,
कच्चे शेंगदाणे, वेलची, सुंठ व जायफळ पावडर
कृति -
प्रथम
तांदुळ धुवून एक ते दिड तास पाण्यात ठेवणे, कच्चे शेंगदाणे पाण्यात भिजवत ठेवणे. तांदुळ
शिजवून घेणें, तांदळाचा भात होईपर्यंत खोबरे किसून,गुळ बारीकसा कापून मंदाग्नीवर ठेवणे,
कच्च्े शेंगदाणे सालकाढून, सुंठ पावडरसह एकत्र गुळाच्या पाकात मिक्स करणे व मंदाग्नीवर
शिजत ठेवणे. शिजल्यावर वेलची जायफळ पावडर पसरणे, आवडीनुसार वा खास पाहुण्यासाठी काजू,
बदाम, मनुका भातावर पसरणे.
No comments:
Post a Comment