Thursday, 25 April 2019

गोडाचे घावण


साहित्य- तांदळाचे पिठ व मिठी
सारणासाठी- आवश्यकतेनुसार खोबरे, गुळसाखर वेलची
कृति-
       प्रथम गुळ बारीक करुन घ्यावा. साखर व गुळ एकत्र करुन मंद अग्नीवर शिजत ठेवावे. नंतर त्यात किसलेले खोबरे टाकावे व थंड झाल्यावर वेलची व जायफळ टाकून मिक्स करावे आवडीनुसार मनुके, काजू, बदाम तुकडे करुन टाकावे. तांदळाचे पिठात मीठ टाकून आवश्यकतेनुसार थोडेस पातळ करावे.
       नंतर तव्यावर पातळसर पीठ पसरविणे व झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजण्यासाठी ठेवावे,पाच मिनिटांनी काविलथ्याने घावण तयार झालेवर उलटविणे व त्यामध्ये गुळ खोबरेचे साहित्य भरुन अर्धा / पाव फोल्ड मारुन लगेचच उतरविणे व आवडीनुसार साजूक तुपात सर्व्ह करणे.
       मुलांना भुख लागल्यावर वा आयत्यावेळी पाहुणे आल्यावर तात्काळ करण्याजोगा हा पक्वान्न आहे व ही पाकक्रिया लवकरच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi