सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे
विशेष तपासणी अभियान
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अन्न व्यवसायिकांसाठी
प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, दि. १२ :- राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 'सणासुदीचे विशेष तपासणी अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत उद्या, १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई येथे अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर, येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राज्यमंत्री योगेश कदम, सचिव धीरज कुमार आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment