समाजातील भेदाभेद दूर करून
एकात्मतेचा संदेश देणे हा संतांचा धर्म
– मंत्री छगन भुजबळ
मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र ही संतभूमी आहे. संत चोखामेळा, संत जनाबाई, संत नामदेव यांसह अनेक संतांनी जात-पात व उच्च-नीच भेद नष्ट करून समतेचा संदेश दिला. संत साहित्याच्या माध्यमातून दया, क्षमा, करुणा आणि प्रेम यांचा प्रसार झाला. समाजातील भेदाभेद दूर करून एकात्मतेचा संदेश देणे हा संतांचा धर्म असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमाला मराठी भाषा, उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आमदार संतोष बांगर, माजी आमदार शहाजी पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील, ह.भ.प. निवृत्ती महाराज रामदास, ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, ह.भ.प.रामदास महाराज तसेच राज्यभरातील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment