Tuesday, 12 August 2025

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

  

‘कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025’चे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई, दि. १२ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025" चे आयोजन महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार करणाऱ्या या महाकुंभचे उद्घाटन १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  

कौशल्य, रोजगार , उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या महाकुंभात क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे अध्यक्षस्थानी असतील तर,  कुस्तीवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत खाशाबा जाधव यांची विशेष उपस्थिती असणार  आहे.

कौशल्य विकास विभाग आणि क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025" चे आयोजन 13 ते 22 ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या महाकुंभात एकूण 16 प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा होणार असून, मल्लखांब, कबड्डी, खो-खो, भालाफेक, विटी - दांडू, कुस्ती, लगोरी,  लंगडी, रज्जूमलखांब, पारंपरिक धाव स्पर्धा इत्यादी स्पर्धांचा समावेश असणार आहे. पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार हे या स्पर्धांचे वैशिष्ठ आहे. कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये युवक-युवतींमध्ये शारीरिक तंदुरूस्ती, संघभावना आणि स्पर्धात्मकता वाढवण्याच्या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी या उपक्रमात जवळपास एक लाखांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यंदादेखील राज्यातील विविध जिल्ह्यातून खेळाडू यात सहभागी होणार आहेत. यावेळी युवक-युवतींना पारंपरिक खेळांविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi