Monday, 29 April 2024

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

                                                                                   

            मुंबईदि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

            अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ताविशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

 

            आज झालेल्या रंगीत तालीम मध्ये राज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बलबृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलमहाराष्ट्र पोलीस ध्वजमुंबई पोलीस ध्वजराज्य राखीव पोलीस बल ध्वजमहाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वजमुंबई अग्निशमन दल ध्वजबृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलमुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलबृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळबृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथकराज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथकबृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथकमुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहनहायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला.

 

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

 

            भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना रंगीत तालीम दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय सेवेतील सहभागी पथकांच्या गटात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी-60 पथकाने प्रथमराज्य राखीव पोलीस बलाने द्वितीय तर बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. शालेय सहभागी पथकांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (मुले)डॉ.अँटोनियो डा सिल्वा हायस्कूलदादर च्या पथकाने प्रथम तर रोड सेफ्टी पेट्रोल (मुली)एमसीएम मुलींचे हायस्कूलकाळाचौकी च्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम गटात नायगाव/ परेल भोईवाडा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने प्रथमग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने द्वितीय तर सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने तृतीय क्रमांचा पुरस्कार मिळविला. 

 

            या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन केले.

 

00000

बी.सी.झंवर/वि.सं.अ/

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi