*विवाहाची आमंत्रणपत्रिका देऊन अपमान करण्याची पद्धत म्हणजे लग्नातले स्वागत व सत्कार समारंभ!*
😊😊
लग्नकार्यात आलेल्या काही मोजक्या श्रीमंत पैसेवाले व मोठ्या लोकांचे स्टेजवरून नाव घेऊन स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच आलेल्या इतर सर्व नातेवाईक व मित्रपरिवाराचा अप्रत्यक्षपणे अपमान समजावा का!
ते म्हणजे वेळात वेळ काढुन आले आणि बाकीचे येणारे काही रिकामटेकडे आहेत का?
*अशा फालतू प्रथा बंद करायला पाहिजेत, असे सुचवावेसे वाटते.*
प्रतिष्ठित असोत की पुढारी, कुणाचेही शब्दसुमनानी स्वागत करणे हेही बंद केलं पाहिजे. प्रतिष्ठित मान्यवरांचे नाव घेऊन स्वागत करायचे म्हणजे लग्नाला पैसे खर्चून येणारे बाकीचे हॉलमधील सगळे समाजबांधव अप्रतिष्ठीत असतात का? नाही. निमंत्रणाचा स्वीकार करून वधु वरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्वच समाज बांधव आणि भगिनी, आप्तेष्ट तसेच मित्रपरिवार देखील आलेले असतात, जे विवाह सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहून सोहळ्याची प्रतिष्ठा वाढवितात. तेव्हा प्रारंभीच उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींचे शाब्दिक स्वागत करून पुढील विवाह विधी नियोजित वेळेवर पार पाडण्याची काळजी घेतली पाहिजे, असे सुचवावेसे वाटते.
🙏🙏
No comments:
Post a Comment