सी-व्हिजिल ॲपवरील प्राप्त तक्रारींचा 100 टक्के निपटारा
- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर
सी - व्हिजिल ॲपवर ऑनलाईन 49 तक्रारी आणि ऑफलाईन 18 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तसेच , आचारसंहिता भंग प्रकरणी प्राप्त 18 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यापैकी चार प्ररकरणी जवळपास 93 लाखांची रक्कम जप्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. यापुढेही असेच काम करून पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस पोलिस उपायुक्त (परिमंडळ 6) हेमराज सिंग राजपूत, (परिमंडळ 7) पुरूषोत्तम कराड, (परिमंडळ 10) मंगेश शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. देविदास क्षीरसागर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, बँकेचे समन्वय अधिकारी, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे अधिकारी, भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाचे अधिकारी, एक खिडकी कक्षाचे समन्वय अधिकारी अमोल शिंदे यांच्यासह सर्व पथकाचे समन्वय अधिकारी उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment