Monday, 29 April 2024

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात एक उमेदवारी अर्ज दाखल मुंबई उपनगर, दि. 29 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांनी, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून एका उमेदवाराने सोमवारी अर्ज दाखल केले. मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातून आज भवानी हिरालाल चौधरी (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी), बबन सोपान ठोके (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून रोहन रामदास साठोणे (अपक्ष) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात सोमवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi