26- मुंबई उत्तर मतदासंघाकरीता
दीपेंद्रकुमार निवडणूक खर्च निरीक्षक
मुंबई उपनगर, दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 26- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी दीपेंद्रकुमार यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे विधानसभेचे 160-कांदिवली पूर्व, 161 चारकोप आणि 162- मालाड पश्चिम या मतदासंघांचे कामकाज असेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांचा मोबाईल क्रमांक 8928567686 असा आहे. खर्च विभागाचे निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांनी 26- मुंबई उत्तर मतदारसंघाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आज घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांच्यासह पोलिस उपायुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, खर्च पथकाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवून नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांनी दिले.
No comments:
Post a Comment