Thursday, 12 November 2026

 गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटन विकासाला आंतरराष्ट्रीय मान्यता

 

मुंबई, दि. 11  : महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण कामगिरीची नोंद झाली आहे. राज्यातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag) हा अंतिम पुरस्कार जाहीर झाला आहे. या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांना अंतिम मान्यता मिळाल्याची माहिती नॅशनल ब्लू फ्लॅग ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरूप यांनी दिली आहे. डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन (FEE) या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत लवकरच या समुद्रकिनाऱ्यांना अधिकृत ‘ब्लू फ्लॅग’ प्रदान करण्यात येणार आहेत.

 

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन राज्यातील पर्यटनस्थळांचा जागतिक दर्जानुसार विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पर्यावरणपूरक पर्यटन, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षितता, पायाभूत सुविधांचा विकास आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन या बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रयत्नांना मिळालेली ही आंतरराष्ट्रीय मान्यता महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

 

‘ब्लू फ्लॅग’ हा जगभरात मान्यता प्राप्त असलेला पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांसाठीचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांची सुरक्षितता, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, आपत्कालीन व्यवस्थापन, पर्यावरणविषयक जनजागृती आणि शाश्वत व्यवस्थापन अशा विविध निकषांच्या आधारे हा पुरस्कार प्रदान केला जातो.

 

गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना मिळालेला अंतिम पुरस्कार हा कोकणाच्या पर्यटन क्षमतेला जागतिक स्तरावर अधोरेखित करणारा आहे. यामुळे महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांकडे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे लक्ष वेधले जाण्यास मदत होणार असून कोकणातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक रोजगार आणि पर्यटनाशी संबंधित पूरक उद्योगांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

 

महाराष्ट्राला सुमारे ८७८ किलोमीटर लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे, समृद्ध सागरी जैवविविधता, ऐतिहासिक वारसा, स्थानिक संस्कृती आणि कोकणी खाद्यसंस्कृती यामुळे कोकण पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर तीन समुद्रकिनाऱ्यांना मिळालेला ब्लू फ्लॅगचा अंतिम पुरस्कार महाराष्ट्राच्या किनारपट्टी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारा ठरणार आहे.

 

 ‘गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅगचा अंतिम पुरस्कार मिळणे ही महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सुरक्षितता आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे मान्यता मिळाली आहे. पर्यटन विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधत महाराष्ट्रात शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर राहणार आहे’, अशी भावना पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव यांनी व्यक्त केली.

 

‘महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅगचा अंतिम पुरस्कार मिळणे ही राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी आहे. या मानांकनामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक दृढ होईल. राज्याला लाभलेल्या विस्तीर्ण आणि निसर्गसमृद्ध किनारपट्टीचा विकास करताना पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षितता आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांचा समतोल राखणे हे शासनाचे प्राधान्य आहे. महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याच्या आमच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे निश्चितच बळ मिळणार आहे. भविष्यात राज्यातील अधिकाधिक पर्यटनस्थळांचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.’ असे पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत राज्यातील पर्यटनस्थळांचा विकास करताना शाश्वत पर्यटन, पर्यावरण संवर्धन, स्थानिक समुदायांचा सहभाग आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना मिळालेला ब्लू फ्लॅगचा अंतिम पुरस्कार हा महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी गौरवास्पद असून राज्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे येण्याच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण ठरणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बारामतीच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून खेळाडूंचा गौरव

 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बारामतीच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून खेळाडूंचा गौरव

 

बारामती, दि. ११: राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्ये बारामती तालुक्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेल्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून गौरव करण्यात आला.

 

दिल्ली येथे पार पडलेल्या ७० व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२६-२७ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बारामतीच्या दोन खेळाडूंनी पदकांची कमाई केली, तर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत एका खेळाडूने देशात प्रथम क्रमांक पटकावून बारामतीचा नावलौकिक वाढविला आहे.  दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कु. श्रावणी संजय शिंदे हिने १४ वर्षांखालील ३३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णयश संपादन केले. तर कु. समृद्धी प्रवीण सावंत हिने १४ वर्षांखालील ३० किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले.

 

खेळाडूंनी भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करून राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा.  राष्ट्रीय स्तरावर बारामतीच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश नवोदित खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.  दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर बारामतीचे नाव उज्ज्वल केले. तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. अनुष्का बापू कुतवळ हिने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात देशात प्रथम क्रमांक मिळवत ऐतिहासिक यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला नगराध्यक्ष सचिन सातव, संभाजी नाना होळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती तालुका दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, मलारी बंडलकर आणि सौरभ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे, क्रीडा शिक्षकांचे तसेच पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


Wednesday, 11 November 2026

घारोड हे अतिदुर्गम डोंगराळ भागातील गाव असून, दुष्काळाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना

 घारोड हे अतिदुर्गम डोंगराळ भागातील गाव असून, दुष्काळाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावर मांडण्यासाठी अशा संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 दरम्यान, घारोड गावातील पाणीपुरवठा योजनेच्या अपूर्ण कामासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देण्यात आली. जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनेस राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या मंजुरीचे पत्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत असून, दुष्काळाच्या परिस्थितीत कुटुंबाचा

 केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत असून, दुष्काळाच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. राज्य शासनानेही त्यात अतिरिक्त मदतीची भर घातली आहे. तसेच दिवाळी अग्रीम म्हणून पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन विविध स्तरांवर उपाययोजना करीत आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प आणि जलसंधारणाच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना करण्यावरही शासनाचा भर आहे. पाण्याची उपलब्धता वाढवून शेतीला सिंचनाची सुविधा मिळावी आणि भविष्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रभाव कमी व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देत दुष्काळावर मात करणार

 केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देत दुष्काळावर मात करणार

                                                                         - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

·         लाडकी बहीण, पीएम किसान, कर्जमाफी आणि नदीजोड प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

·        केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा घारोड येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद;
एकल निराधार महिलांसोबत साजरी केली भाऊबीज

 बुलढाणा, दि. 11 (जिमाका): अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक आधार देऊन दुष्काळावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

 खामगाव तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ घारोड गावात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. साऊ एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने आयोजित भाऊबीज कार्यक्रमानिमित्त दि. 10 नोव्हेंबर रोजी रात्री केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी घारोड येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी एकल निराधार महिला देवकाबाई अढाव आणि दुर्गा अनंता कड यांच्या घरी भेट देत त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

 आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

गेल्या दोन वर्षांत आदिवासी विकास विभागाने शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पवित्र पोर्टलद्वारे २ हजार ५०० हून अधिक शिक्षकांची पारदर्शक भरती करण्यात आली असून ३ हजारांहून अधिक कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सेमी-इंग्रजी व सीबीएसई पॅटर्न, शाळांमध्ये क्रीडा, कला व संगीत शिक्षकांची नियुक्ती तसेच स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

 

आश्रमशाळांमध्ये पहिल्यांदाच परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेच्या भत्त्यात ३३ टक्के वाढ करून या योजनेचा विस्तार ग्रामीण भागातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘वीर राघोजी भांगरे’ शिष्यवृत्ती, महिलांसाठी ‘राणी दुर्गावती योजना’ आणि युवकांसाठी ‘विशेष उद्योजकता विकास योजना’ सुरू करण्यात आली आहे.

 

कोलाम, कातकरी, माडिया व पारधी जमातींसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये भोजन व्यवस्था (मेस सुविधा) पुन्हा सुरू करण्याची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनकातकरी समाजातील नागरिकांना १४ हजार ४४१ आधारकार्ड, १३ हजार ४८६ जातीचे दाखले

 पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या वतीने सेवा सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, स्मारक स्वच्छता व दीपोत्सव, रानभाजी महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी मेळावे, आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरे तसेच आधारकार्ड व इतर शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिरांचा समावेश आहे.   प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन) योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात १ हजार ९६७ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी भूमिहीन ८६३ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आंबेगाव, भोर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर आणि राजगड या सात तालुक्यांतील आणखी ६४० लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.

 

जिल्ह्यातील कातकरी समाजातील नागरिकांना १४ हजार ४४१ आधारकार्ड, १३ हजार ४८६ जातीचे दाखले आणि ११ हजार १७० रेशनकार्ड वितरित करण्यात आले आहेत. तसेच ४ हजार २०० नागरिकांना आयुष्मान कार्ड, ९७१ नागरिकांना जनधन बँक खाते आणि ४८५ नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi