Wednesday, 11 November 2026

पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनकातकरी समाजातील नागरिकांना १४ हजार ४४१ आधारकार्ड, १३ हजार ४८६ जातीचे दाखले

 पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या वतीने सेवा सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, स्मारक स्वच्छता व दीपोत्सव, रानभाजी महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी मेळावे, आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरे तसेच आधारकार्ड व इतर शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिरांचा समावेश आहे.   प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन) योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात १ हजार ९६७ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी भूमिहीन ८६३ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आंबेगाव, भोर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर आणि राजगड या सात तालुक्यांतील आणखी ६४० लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.

 

जिल्ह्यातील कातकरी समाजातील नागरिकांना १४ हजार ४४१ आधारकार्ड, १३ हजार ४८६ जातीचे दाखले आणि ११ हजार १७० रेशनकार्ड वितरित करण्यात आले आहेत. तसेच ४ हजार २०० नागरिकांना आयुष्मान कार्ड, ९७१ नागरिकांना जनधन बँक खाते आणि ४८५ नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi