Wednesday, 11 November 2026

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देत दुष्काळावर मात करणार

 केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देत दुष्काळावर मात करणार

                                                                         - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

·         लाडकी बहीण, पीएम किसान, कर्जमाफी आणि नदीजोड प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

·        केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा घारोड येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद;
एकल निराधार महिलांसोबत साजरी केली भाऊबीज

 बुलढाणा, दि. 11 (जिमाका): अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक आधार देऊन दुष्काळावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

 खामगाव तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ घारोड गावात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. साऊ एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने आयोजित भाऊबीज कार्यक्रमानिमित्त दि. 10 नोव्हेंबर रोजी रात्री केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी घारोड येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी एकल निराधार महिला देवकाबाई अढाव आणि दुर्गा अनंता कड यांच्या घरी भेट देत त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi