Friday, 6 November 2026

एमपीएससी’च्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी; निवेदने प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन

 एमपीएससी’च्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी;

निवेदने प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि.५ :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका तसेच उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणांशी संबंधित माहिती, पुरावे किंवा तक्रारी असलेल्या व्यक्तींना आपली निवेदने आयोगाने निश्चित केलेल्या विहित प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यातच सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाने केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे. या संदर्भात परीक्षार्थी, विद्यार्थी, व्यक्ती तसेच नोंदणीकृत संस्थांनी आपली निवेदने १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावीत.

निवेदन सादर करण्यामध्ये सुस्पष्टता राहावी, यासाठी आयोगाने प्रतिज्ञापत्राचा निश्चित नमुना उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार संबंधितांनी आपली निवेदने मराठी किंवा इंग्रजी भाषेत नोटराईज्ड प्रतिज्ञापत्रासोबत आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे. कार्यालयाचा पत्ता : अन्न व औषध प्रशासन भवन, दालन क्र.२०१, दुसरा मजला, बीकेसी वांद्रे, (पूर्व), मुंबई-५१. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत तसेच संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्यात. याशिवाय  नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र, निवेदन आणि संबंधित कागदपत्रांची एक प्रत आयोगाच्या complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवरही पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

            तक्रारी दाखल करण्यासंदर्भात आवश्यक माहिती किंवा मदतीसाठी ०२२-२०८६७६७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव मुंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे

0000



स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या सेवा एसएफएस पोर्टलद्वारे अधिक सुलभ व पारदर्शक

 स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या सेवा एसएफएस पोर्टलद्वारे अधिक सुलभ व पारदर्शक

–शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

  • स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी १० सेवा ‘एसएफएस’ पोर्टलवर उपलब्ध
  • नवीन पोर्टलचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन

 

            मुंबई, दि. ५ : स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित विविध शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विकसित केलेल्या नवीन ‘एसएफएस’ (सेल्फ फायनान्स्ड स्कूल्स) पोर्टलचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झाले.

 

            या पोर्टलमुळे स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणि शैक्षणिक संस्थांना विविध सेवांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे तसेच अर्जाच्या प्रक्रियेचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. अर्ज प्रक्रिया डिजिटल झाल्याने शासकीय कामकाज अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. पोर्टल विकसित करणाऱ्या पथकाचेही त्यांनी अभिनंदन केले.

 

            नवीन पोर्टलवर मंडळ संलग्नता ना-हरकत प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण, दोन सत्रांतील शाळेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र, शाळेचे स्थलांतर, शाळा व्यवस्थापनाचे हस्तांतरण, इयत्ता अकरावीसाठी अतिरिक्त तुकडी आणि अतिरिक्त शाखा सुरू करण्याची परवानगी, मंडळ बदल तसेच शाळेचे नाव व माध्यम बदलण्याची परवानगी, ना-हरकत प्रमाणपत्र संलग्नता रद्द करणे आणि प्रवेशक्षमता वाढविणे अशा एकूण १० सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

 

            शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम आणि अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करून शालेय गुणवत्तावाढीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री भुसे यांनी यानिमित्ताने केले.

 

            यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सर्व संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख ऑनलाइन उपस्थित होते.

०००००

L

 


हिंगोली, पेठ व जांबुटके आणि नाशिक पेठ येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक

 हिंगोली, पेठ व जांबुटके आणि नाशिक पेठ येथे एमआयडीसी स्थापन

करण्याबाबत शासन सकारात्मक

  • उच्चाधिकार समितीसमोर प्रस्ताव सादर करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

 

            मुंबई, दि. ५ : हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ व जांबुटके येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. यासंदर्भातील प्रस्ताव उच्चाधिकार समितीसमोर लवकर सादर करण्याचे निर्देश त्यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.

 

            हिंगोली जिल्ह्यात सध्या चार औद्योगिक क्षेत्रे कार्यान्वित असून, औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी अतिरिक्त हिंगोली टप्पा-१, टप्पा-२ आणि हिंगोली एमएसएमई पार्क अशा तीन नवीन औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाची कार्यवाही सुरू आहे. लायगो प्रकल्पाला बाधा न येता पर्यायी शासकीय जमिनीवर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचे पर्यायही तपासण्यात येत आहेत.

 

            हिंगोलीतील लिंबाळा औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ७० उद्योगघटक कार्यरत असून, त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे ५०० कोटी रुपये आहे. या उद्योगांमधून सुमारे ९०० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

 

            यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र हजारे, एस. आर. बर्गे, खाजगी सचिव सतिश जाधव, प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

०००००


 


कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा

 कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा

-         उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘एसआरए‘ला निर्देश

  • चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली मतदारसंघातील पुनर्वसन, पुनर्विकास व नागरी सुविधांच्या विषयांचाही आढावा

मुंबई, दि. ५ : कुर्ला-ट्रॉम्बे परिसरात वर्षानुवर्षांपासून रेल्वे ट्रॅकलगत वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. यावेळी संबंधित विषयांचा सविस्तर आढावा घेतला. 

वेगवेगळ्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीस माजी खासदार प्रकाश आंबेडकर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, आमदार दिलीप लांडे, आमदार मंगेश कुडाळकर, सुजात आंबेडकर आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, एमएमआरडीए, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीने बैठकीस उपस्थित होते.

यावेळी कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील चिखलवाडी, आरसीएफ-प्रियदर्शनी ते माहुलपर्यंत रेल्वे ट्रॅकलगत वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून, एकूणच परिस्थितीची माहिती देऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.

उपमुख्यमंत्री म्हणाले, रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावल्याने अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या झोपडीपट्टीधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी एसआरएने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा.

खारदेव नगर येथील मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बैठ्या पत्रा चाळ वसाहतीचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यासह अन्य प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. चेंबूर विधानसभा मतदारसंघातील मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या निवासी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा विषय बैठकीत मांडण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी आकारण्यात येणाऱ्या प्रीमियमबाबत नवे धोरण लागू करण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी महानगरपालिकेची निवासस्थाने निवृत्तीनंतरही खाली न केल्यामुळे अनेक निवृत्त महापालिका कर्मचाऱ्यांचे आर्थिक लाभ आणि पेन्शन थांबविण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, निवृत्त कर्मचाऱ्यांची संपूर्ण रक्कम थांबविणे योग्य नाही. काही निवृत्त कर्मचाऱ्यांची मुले अनुकंपा तत्वावर महानगरपालिकेत नोकरीला लागल्यामुळे त्यांना तातडीने घरे खाली करणे शक्य होत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्राधान्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कुर्ला विधानसभा मतदारसंघातील नेहरू नगर, टिळक नगर, सहकार नगर आणि नवीन टिळक नगर या म्हाडा वसाहतींमधील मलनिःसारण वाहिन्यांच्या समस्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या वसाहतींमधील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. याशिवाय साबळे नगर, क्रांती नगर आणि संतोषीमाता नगर येथील रेल्वेलगत असलेल्या झोपड्यांचा तसेच बर्मा सेल लाईनवरील रेल्वे प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा विषय बैठकीत मांडण्यात आला. संबंधित नागरिकांचे पुनर्वसन आणि त्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार दिलीप लांडे यांनी चांदिवली विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित नागरी समस्या मांडल्या. साकीनाका पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी महानगरपालिकेचा आरक्षित भूखंड उपलब्ध करून देणे, डोंगरउतार व पायथ्याशी असलेल्या धोकादायक वस्त्यांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे तसेच साकीनाका परिसरातील हरित पट्टा निवासी विभागात समाविष्ट करण्याचा मुद्दा त्यांनी मांडला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

0000


 


प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बदलापूर येथील जोवेली येथे ४ हजार ५९० आणि कल्याण तालुक्यातील माणिवली

 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बदलापूर येथील जोवेली येथे ४ हजार ५९० आणि कल्याण तालुक्यातील माणिवली येथे ५ हजार ३३० अशी एकूण ९ हजार ९२० परवडणारी घरे उभारण्याच्या प्रस्तावाचाही आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. सर्व प्रकल्प अत्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेक्ट आणि विकासक यांना सहभागी करून घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी सुधारित आकृतिबंध आणि सेवाशर्ती नियमावलीबाबतही यावेळी चर्चा

कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा

 कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा

-         उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘एसआरए‘ला निर्देश

  • चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली मतदारसंघातील पुनर्वसन, पुनर्विकास व नागरी सुविधांच्या विषयांचाही आढावा

मुंबई, दि. ५ : कुर्ला-ट्रॉम्बे परिसरात वर्षानुवर्षांपासून रेल्वे ट्रॅकलगत वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. यावेळी संबंधित विषयांचा सविस्तर आढावा घेतला. 

वेगवेगळ्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीस माजी खासदार प्रकाश आंबेडकर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, आमदार दिलीप लांडे, आमदार मंगेश कुडाळकर, सुजात आंबेडकर आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, एमएमआरडीए, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीने बैठकीस उपस्थित होते.

यावेळी कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील चिखलवाडी, आरसीएफ-प्रियदर्शनी ते माहुलपर्यंत रेल्वे ट्रॅकलगत वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून, एकूणच परिस्थितीची माहिती देऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.

उपमुख्यमंत्री म्हणाले, रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावल्याने अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या झोपडीपट्टीधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी एसआरएने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा.


कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरातील समूह पुनर्विकास योजनांना गती देण्याबाबतही

 कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरातील समूह पुनर्विकास योजनांना गती देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सहा समूहांचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. उल्हासनगरमध्येही २९ पेक्षा अधिक समूहांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. या योजनांसाठी आवश्यक सर्वेक्षण, नियोजन आणि सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले

            प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बदलापूर येथील जोवेली येथे ४ हजार ५९० आणि कल्याण तालुक्यातील माणिवली येथे ५ हजार ३३० अशी एकूण ९ हजार ९२० परवडणारी घरे उभारण्याच्या प्रस्तावाचाही आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. सर्व प्रकल्प अत्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेक्ट आणि विकासक यांना सहभागी करून घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी सुधारित आकृतिबंध आणि सेवाशर्ती नियमावलीबाबतही यावेळी चर्चा झाली.


००००



 

Featured post

Lakshvedhi