एमपीएससी’च्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी;
निवेदने प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि.५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका तसेच उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणांशी संबंधित माहिती, पुरावे किंवा तक्रारी असलेल्या व्यक्तींना आपली निवेदने आयोगाने निश्चित केलेल्या विहित प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यातच सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाने केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे. या संदर्भात परीक्षार्थी, विद्यार्थी, व्यक्ती तसेच नोंदणीकृत संस्थांनी आपली निवेदने १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावीत.
निवेदन सादर करण्यामध्ये सुस्पष्टता राहावी, यासाठी आयोगाने प्रतिज्ञापत्राचा निश्चित नमुना उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार संबंधितांनी आपली निवेदने मराठी किंवा इंग्रजी भाषेत नोटराईज्ड प्रतिज्ञापत्रासोबत आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे. कार्यालयाचा पत्ता : अन्न व औषध प्रशासन भवन, दालन क्र.२०१, दुसरा मजला, बीकेसी वांद्रे, (पूर्व), मुंबई-५१. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत तसेच संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्यात. याशिवाय नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र, निवेदन आणि संबंधित कागदपत्रांची एक प्रत आयोगाच्या complaints.inquirycomm.mpsc@
तक्रारी दाखल करण्यासंदर्भात आवश्यक माहिती किंवा मदतीसाठी ०२२-२०८६७६७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव मुंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे
0000
No comments:
Post a Comment