Tuesday, 20 October 2026

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत

ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. १९ : क्रीडा विभागामार्फत २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत सहभागी खेळाडू व व्यक्तींनी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहराच्या जिल्हा क्रीडा अधिकारी  निलिमा अडसूळ यांनी केले आहे.

 

            राज्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांद्वारे गौरविण्यात येते. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांतील उल्लेखनीय कामगिरीसाठीच्या पुरस्कारांचा समावेश आहे.  इच्छुकांनी दिलेल्या मुदतीत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

00

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्र २२ ऑक्टोबरला नागपुरात विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

 सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्र २२ ऑक्टोबरला नागपुरात

विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. १९ : सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या उपक्रमाविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नागपूर येथे गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.४५ ते सायंकाळी ४.४५ या वेळेत वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, डोंगरगाव, वर्धा रोड, नागपूर येथे विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांनी या सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

            महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील इच्छुकांना नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या जनजागृती सत्रामध्ये उपक्रमाची उद्दिष्टे, सहभागाच्या संधी तसेच सहभाग प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील हे उपस्थित संबंधित घटकांशी संवाद साधणार आहेत.

 

            जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, नवसंशोधक, उद्योजक तसेच संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त इच्छुकांपर्यंत पोहोचवावी व जनजागृती सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त नि. प्र. औघड, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर यांनी केले आहे.

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धे’बाबत पुण्यात २२ ऑक्टोबरला जनजागृती सत्रऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ याCOEP भाऊ इन्स्टिट्यूट’चे सहकार्य

 ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धे’बाबत पुण्यात २२ ऑक्टोबरला जनजागृती सत्र

विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. १९ : सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’च्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत पुणे येथे २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

 

            सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राज्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांना नाविन्यपूर्ण कल्पना व उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग हा उपक्रम राबवत आहे. पुण्यातील सत्राच्या स्थानिक आयोजन व समन्वयासाठी ‘COEP भाऊ इन्स्टिट्यूट’चे सहकार्य घेण्यात येत आहे.

 

            सत्रात उपक्रमाची उद्दिष्टे, सहभागाच्या संधी आणि संबंधित प्रक्रियेची माहिती देण्यात येईल. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित भागधारकांशी संवाद साधतील.

 

           जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, नवसंशोधक, उद्योजक आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती इच्छुकांपर्यंत पोहोचवून सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे. सत्राचे निश्चित स्थळ आणि अन्य आवश्यक सूचना स्थानिक असे  जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त आवाहन सु.रा.वराडे यांच्याकडून कळविण्यात येतील

 

०००००

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धे’साठी नाशिकमध्ये जनजागृती सत्र · विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स व उद्योजकांना सहभागाची संध

 सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धे’साठी नाशिकमध्ये जनजागृती सत्र

· विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स व उद्योजकांना सहभागाची संध

मुंबई, दि. १९ : सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’विषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (एमएसआयएनएस) नाशिक येथे २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत विशेष सत्र आयोजित करणार आहे.


 


राज्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांना नाविन्यपूर्ण कल्पना व उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सत्राच्या स्थानिक आयोजन व समन्वयासाठी सह्याद्री फार्म्सचे सहकार्य घेण्यात येत आहे.


 


या सत्रात उपक्रमाची उद्दिष्टे, सहभागाच्या संधी आणि संबंधित प्रक्रियेची माहिती दिली जाईल. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित भागधारकांशी संवाद साधतील.


जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, नवसंशोधक, उद्योजक आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती इच्छुकांपर्यंत पोहोचवून सत्रात सहभागी व्हावे. सत्राचे निश्चित स्थळ आणि इतर आवश्यक सूचना जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त आवाहन वि.रा.रिसे यांच्याकडून कळविण्यात येतील.


0000

बालकांच्या वाढीवर आणि पोषणस्थितीवर नियमित लक्ष ठेवले जाणार

 बालकांच्या वाढीवर आणि पोषणस्थितीवर नियमित लक्ष ठेवले जाणार


कुपोषणाचे प्रमाण वाढू नये, यासाठी बालकांच्या वाढीवर आणि पोषणस्थितीवर नियमित लक्ष ठेवले जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत बालकांची दरमहा उंची आणि वजन मोजून त्याची नोंद पोषण ट्रॅकरमध्ये करण्यात येणार आहे. या नोंदींच्या आधारे पोषणविषयक अडचणी असलेल्या बालकांची ओळख करून त्यांच्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येणार आहेत. तीव्र कुपोषित बालकांना व्हीसीडीसी/यूसीडीसीमार्फत अतिरिक्त ऊर्जा-दाट पोषण आहार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. गंभीर आरोग्यसमस्या असलेल्या बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करून आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यासाठीही कार्यवाही करण्यात येत आहे. आजारी किंवा कुपोषित बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांकडे संदर्भित करून त्यांच्या उपचारांची व्यवस्था केली जाणार आहे.

बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची नियमित आरोग्य तपासणी

 बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची नियमित आरोग्य तपासणी


दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि दूषित पाण्यामुळे जुलाब, कावीळ, विषमज्वर तसेच निर्जलीकरणासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. लहान बालके आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने यासंदर्भात काळजी घेणे महत्वाचे ठरते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर करणे, अंगणवाडी केंद्रांमध्ये ओआरएस पाकिटे आणि झिंकच्या गोळ्यांचा पुरेसा साठा ठेवणे, तसेच पाणी व इंधनाची गंभीर टंचाई असलेल्या केंद्रांची माहिती वेळेत मिळविणे यावर भर देण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या समन्वयाने बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासह आवश्यक औषधे, जीवनसत्त्वे आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.


 

अंगणवाडी केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या आहाराचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियोजन

 अंगणवाडी केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या आहाराचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियोजन

दुष्काळामुळे अन्नधान्य, पाणी आणि इंधनाच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन अंगणवाडी केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या आहाराचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. बालकांना गरम ताजा आहार, घरपोच आहार (टीएचआर) आणि अमृत आहार वेळेत उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. जिल्हास्तरीय आहारपुरवठा समित्यांना अन्नधान्याचा साठा, पाण्याची उपलब्धता आणि इंधनाची स्थिती यांचा आढावा घेऊन समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर टंचाई निर्माण झाल्यास लाभार्थ्यांच्या आहारपुरवठ्यात खंड पडू नये, यासाठी आवश्यकतेनुसार आहाराच्या मेनूमध्ये तात्पुरते बदल करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

अंगणवाडी केंद्रांमध्ये आहार शिजविण्यासाठी आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांमध्ये अंगणवाडी केंद्रांना प्राधान्याने पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा समित्यांशी समन्वय साधण्यात येत आहे. गरम ताजा आहार तयार करणाऱ्या महिला बचत गटांनाही आवश्यक पाणी आणि इंधन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पूर्वनियोजन केले जात आहे. दुष्काळामुळे मूलभूत सुविधांवर ताण निर्माण झाला, तरी बालकांच्या आहारात व्यत्यय येऊ नये, हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे.

Featured post

Lakshvedhi