बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची नियमित आरोग्य तपासणी
दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि दूषित पाण्यामुळे जुलाब, कावीळ, विषमज्वर तसेच निर्जलीकरणासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. लहान बालके आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने यासंदर्भात काळजी घेणे महत्वाचे ठरते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर करणे, अंगणवाडी केंद्रांमध्ये ओआरएस पाकिटे आणि झिंकच्या गोळ्यांचा पुरेसा साठा ठेवणे, तसेच पाणी व इंधनाची गंभीर टंचाई असलेल्या केंद्रांची माहिती वेळेत मिळविणे यावर भर देण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या समन्वयाने बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासह आवश्यक औषधे, जीवनसत्त्वे आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
No comments:
Post a Comment