Tuesday, 20 October 2026

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्र २२ ऑक्टोबरला नागपुरात विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

 सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्र २२ ऑक्टोबरला नागपुरात

विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. १९ : सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या उपक्रमाविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नागपूर येथे गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.४५ ते सायंकाळी ४.४५ या वेळेत वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, डोंगरगाव, वर्धा रोड, नागपूर येथे विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांनी या सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

            महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील इच्छुकांना नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या जनजागृती सत्रामध्ये उपक्रमाची उद्दिष्टे, सहभागाच्या संधी तसेच सहभाग प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील हे उपस्थित संबंधित घटकांशी संवाद साधणार आहेत.

 

            जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, नवसंशोधक, उद्योजक तसेच संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त इच्छुकांपर्यंत पोहोचवावी व जनजागृती सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त नि. प्र. औघड, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi