शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत
ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १९ : क्रीडा विभागामार्फत २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत सहभागी खेळाडू व व्यक्तींनी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत https://sports.maharashtra.
राज्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांद्वारे गौरविण्यात येते. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांतील उल्लेखनीय कामगिरीसाठीच्या पुरस्कारांचा समावेश आहे. इच्छुकांनी दिलेल्या मुदतीत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
00
No comments:
Post a Comment