Friday, 25 September 2026

जऊळका (तहसील मालेगांव) में किसान संतोष सखाराम डुंबले के खेत की मेड़ पर जाकर मुख्यमंत्री ने सूखा सदृश स्थिति का जायजा

 जऊळका (तहसील मालेगांव) में किसान संतोष सखाराम डुंबले के खेत की मेड़ पर जाकर मुख्यमंत्री ने सूखा सदृश स्थिति का जायजा लिया। उन्होंने उपस्थित किसानों से संवाद किया। इस अवसर पर किसान संतोष की माताजी शकुंतलाबाई ने भी सूखे की स्थिति के कारण उत्पन्न कठिनाइयों से मुख्यमंत्री को अवगत कराया।

इस दौरे के दौरान मुख्यमंत्री ने क्षेत्र की फसल एवं जल स्थिति की विस्तृत जानकारी लेते हुए नुकसानग्रस्त किसानों को तत्काल मुआवजा देने की अपनी घोषणा को दोहराया। अत्यल्प वर्षा के कारण प्राकृतिक संकट का सामना कर रहे नुकसानग्रस्त किसानों को राहत दी जाएगी। संकट की इस घड़ी में सरकार किसानों के साथ है। किसानों को किसी प्रकार की चिंता करने की आवश्यकता नहीं है। हुए नुकसान का आकलन कर सरकार द्वारा आवश्यक सहायता प्राथमिकता के आधार पर और जल्द से जल्द प्रदान की जाएगी, ऐसी ग्वाही भी मुख्यमंत्री ने दी।

आगामी अवधि में पेयजल की कमी उत्पन्न न हो, इसके लिए आवश्यक नियोजन किया जाएगा। इसी प्रकार चारे की उपलब्धता सुनिश्चित करने के लिए भी आवश्यक सावधानी बरती जाएगी। किसानों को सरकार की सहायता सीधे प्राप्त हो, इसके लिए जल्द ही कार्यवाही शुरू की जाएगी, ऐसा भी उन्होंने इस अवसर पर कहा।

किसानों को मुआवजा देने की घोषणा दोहराई · म्हसला, मोहगव्हाण और जऊळका में फसल एवं जल स्थिति का लिया जायजा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने वाशिम जिले में फसल क्षति की स्थिति का किया जायजा

 

·         किसानों को मुआवजा देने की घोषणा दोहराई

·         म्हसला, मोहगव्हाण और जऊळका में फसल एवं जल स्थिति का लिया जायजा

 

वाशिम, 24 सितंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने वाशिम जिले के म्हसला (तहसील कारंजा), मोहगव्हाण (तहसील मंगरुळपीर) और जऊळका (तहसील मालेगांव) में किसानों के खेतों की मेड़ पर जाकर सूखा सदृश स्थिति की पृष्ठभूमि में फसल एवं जल स्थिति का जायजा लिया। किसानों को मुआवजा देने की घोषणा को दोहराते हुए मुख्यमंत्री ने किसानों को राहत देने का आश्वासन दिया।

सूखा सदृश स्थिति की पृष्ठभूमि में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पश्चिम विदर्भ, अर्थात अमरावती संभाग में फसल एवं जल स्थिति का जायजा लिया। वाशिम जिले के म्हसला (तहसील कारंजा) में किसान देविदास किशन काले के खेत में जाकर उन्होंने खेत में क्षतिग्रस्त सोयाबीन और अरहर की फसल का निरीक्षण किया तथा किसानों से संवाद किया।

मोहगव्हाण (तहसील मंगरुळपीर) में किसान अनिल भगरे तथा अब्दुल नईम शेख रहीम के खेतों में फसल के नुकसान का जायजा लिया। इस अवसर पर उन्होंने किसान भाइयों से संवाद कर उनकी समस्याएं जानीं। उन्होंने कहा कि कम वर्षा के कारण सोयाबीन, अरहर सहित अन्य फसलों को बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। किसानों के सामने यह बड़ा संकट है। हालांकि, किसान भाई हिम्मत न हारें। सरकार किसानों के साथ है। उन्हें अधिकतम संभव सहायता प्रदान की जाएगी। इस संबंध में अधिसूचना भी जल्द ही जारी की जाएगी।

।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी · शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार · म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची केली पाहणी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी

·         शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार

·         म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची केली पाहणी

 

            वाशिम, दि. २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी वाशिम जिल्ह्यातील म्हसला (ता. कारंजा) मोहगव्हाण (ता. मंगरुळपीर) आणि जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक व पाणी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली.

 

            दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभागातील पिक पाणी परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. वाशिम जिल्ह्यातील म्हसला, (ता.कारंजा) येथील शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेतात जाऊन शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीन व तुर पिकाची पाहणी करीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकाचे

 पीक परिस्थितीचा आढावा

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले असून मुगाची पेरणी ४७.८३% आणि उडदाची पेरणी ६१.४५% झाली आहे. तसेच कपाशीची ९१.६६% पेरणी झाली असून पिके पाती, फुलोरा व बोंडे धरण्याच्या अवस्थेत आहेत. पावसा अभावी  वाढ खुंटली असून पाती व फुलांची गळ होत आहे. तसेच काही ठिकाणी रस शोषक कीड व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनची ११३.०३% पेरणी झाली असून पीक सध्या शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत आहे. पाण्याच्या ताणामुळे शेंगा चपटी राहून दाणे बारीक राहण्याची व हलक्या जमिनीवरील पिके सुकण्याची शक्यता आहे.

 

 मका पिकाची १६३.३४% पेरणी झाली असून पिके कणसे भरण्याच्या अवस्थेत आहेत. अपुऱ्या पावसामुळे वाढ खुंटली असून वजनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.तुरीची १३४.३२% पेरणी झाली असून पाण्याच्या ताणामुळे वाढ खुंटली आहे. खरीप बाजरीची ६३.८३% पेरणी झाली असून पावसाच्या खंडामुळे बाजरीची वाढ खुंटून पीक सुकले आहे. जिल्ह्यात एकूण झालेले पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  सुधाकर बोराळे यांनी सादर केला

शेताच्या बांधावर जात कृषिमंत्र्यांनी शेतकरी बांधवास दिला धीर

 शेताच्या बांधावर जात कृषिमंत्र्यांनी शेतकरी  बांधवास दिला धीर

सोयाबीन पिकाची पाहणी करत असताना पावसाअभावी सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शेतकरी बांधवांना धीर दिला. कृषिमंत्री भरणे म्हणाले की मी स्वतः शेतकरी असून शेतकऱ्यांच्या वेदना आणि परिस्थिती अनुभवली असल्याने आपण  शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी असून शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व मदतीसाठी खंबीरपणे उभे राहू.  शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होण्यास अडचण होऊ नये यासाठी वीज महावितरण च्या संबंधित विभागाने डीपी आणि ट्रांसफार्मर योग्य वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतचे  निर्देश त्यांनी महावितरण विभागास दिले.

दुष्काळसदृश कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे कर्तव्य असून

 बांधावर जाऊन शेतकरी बांधवांना लाभ देण्याचे निर्देश

दुष्काळसदृश कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे कर्तव्य असून प्रशासनामार्फत  शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

 

            शेतकऱ्यांच्या हिताला आणि मदतीला सर्वोच्च प्राधान्य देऊन शेती, पशुपालन, चारा व पाणीटंचाई यावर तातडीने उपाययोजना करण्याचे सूचित केले. केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठीची परिपूर्ण अधिसूचना शासन स्तरावरून लवकरच निर्गमित केली जाणार आहे. यामध्ये सर्वसमावेशक मदतीचा समावेश असणार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कृषिमंत्र्यांनी  स्पष्ट केले.


कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संगमनेरमध्ये नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची केली पाहणी · शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही

 कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संगमनेरमध्ये नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची  केली पाहणी

·         शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही

 

शिर्डी, दि.२४ (उमाका): शेतकऱ्यांना सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ पीक विमा आणि कर्जमुक्ती योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले सांगितले. संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावातील शेतकरी सोपान चकोर यांच्या शेताच्या बांधावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.

 

यावेळी त्यांच्यासोबत संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक, बाबासाहेब जेजूरकर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सुधाकर बोराळे संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती बोडखे यांच्यासह महावितरण, ग्रामविकास आणि महसूल विभागाचे संबंधित अधिकारी आणि पिंपळे गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पिंपळे गावातील काही शेतकऱ्यांच्या पीक विम्यात येत असलेल्या अडचणींची तातडीने दखल घेत, कृषी आणि महसूल विभागाने याबाबत तातडीने चालू खरीप हंगामात कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री भरणे यांनी संबंधितांना दिले.

 

Featured post

Lakshvedhi