बांधावर जाऊन शेतकरी बांधवांना लाभ देण्याचे निर्देश
दुष्काळसदृश कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे कर्तव्य असून प्रशासनामार्फत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
शेतकऱ्यांच्या हिताला आणि मदतीला सर्वोच्च प्राधान्य देऊन शेती, पशुपालन, चारा व पाणीटंचाई यावर तातडीने उपाययोजना करण्याचे सूचित केले. केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठीची परिपूर्ण अधिसूचना शासन स्तरावरून लवकरच निर्गमित केली जाणार आहे. यामध्ये सर्वसमावेशक मदतीचा समावेश असणार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment