पीक परिस्थितीचा आढावा
अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले असून मुगाची पेरणी ४७.८३% आणि उडदाची पेरणी ६१.४५% झाली आहे. तसेच कपाशीची ९१.६६% पेरणी झाली असून पिके पाती, फुलोरा व बोंडे धरण्याच्या अवस्थेत आहेत. पावसा अभावी वाढ खुंटली असून पाती व फुलांची गळ होत आहे. तसेच काही ठिकाणी रस शोषक कीड व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनची ११३.०३% पेरणी झाली असून पीक सध्या शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत आहे. पाण्याच्या ताणामुळे शेंगा चपटी राहून दाणे बारीक राहण्याची व हलक्या जमिनीवरील पिके सुकण्याची शक्यता आहे.
मका पिकाची १६३.३४% पेरणी झाली असून पिके कणसे भरण्याच्या अवस्थेत आहेत. अपुऱ्या पावसामुळे वाढ खुंटली असून वजनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.तुरीची १३४.३२% पेरणी झाली असून पाण्याच्या ताणामुळे वाढ खुंटली आहे. खरीप बाजरीची ६३.८३% पेरणी झाली असून पावसाच्या खंडामुळे बाजरीची वाढ खुंटून पीक सुकले आहे. जिल्ह्यात एकूण झालेले पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सादर केला
No comments:
Post a Comment