Friday, 25 September 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी · शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार · म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची केली पाहणी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी

·         शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार

·         म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची केली पाहणी

 

            वाशिम, दि. २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी वाशिम जिल्ह्यातील म्हसला (ता. कारंजा) मोहगव्हाण (ता. मंगरुळपीर) आणि जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक व पाणी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली.

 

            दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभागातील पिक पाणी परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. वाशिम जिल्ह्यातील म्हसला, (ता.कारंजा) येथील शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेतात जाऊन शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीन व तुर पिकाची पाहणी करीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi