Friday, 18 September 2026

महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू · महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत उपक्रम

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टलचे उद्घाटन

 

·         महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू

·         महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत उपक्रम

 

            मुंबई, दि. १७ : महिला शेतकरी पोर्टलचे उद्घाटन  भरणेवाडी येथून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते  ऑनलाईन करण्यात आले.  महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, विस्तार सेवा तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत महिला शेतकऱ्यांना मान्यता देणे, त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देणे आणि अधिकृत डेटाबेस तयार करणे यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.  यावेळी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयुक्त सूरज मांढरे,संचालक उदय देशमुख उपस्थित होते.

 

राज्यातील महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महिला शेतकऱ्यांसाठी प्रमाणपत्र मिळविण्याची ऑनलाइन सुविधा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी https://krishi.maharashtra.gov.in⁠ या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

दिव्यांगांसाठी दया नव्हे, समान संधी निर्माण करणे समाजाची जबाबदारी

 दिव्यांगांसाठी दया नव्हे, समान संधी निर्माण करणे समाजाची जबाबदारी

- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

 

·         सेवा संकल्प अभियानांतर्गत वर्मा फाउंडेशन व मैत्री पीस फाउंडेशनतर्फे व्हीलचेअर वितरण आणि राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार सोहळा

 

            मुंबई, दि. १७ : दिव्यांग व्यक्तींकडे अपंगत्वाच्या नव्हे तर त्यांच्यातील क्षमता, प्रतिभा आणि दृढनिश्चयाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. त्यांच्याविषयी केवळ सहानुभूती व्यक्त न करता त्यांच्यासाठी समान संधी निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

 

            लोकभवन सेवा संकल्प अभियानांतर्गत वर्मा फाउंडेशन आणि मैत्री पीस फाउंडेशन यांच्या वतीने वाय. बी. चव्हाण सभागृह येथे आयोजित व्हीलचेअर वितरण शिबीर आणि राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल वर्मा बोलत होते. यावेळी महामंडलेश्वर राजेश ओझा महाराज, मैत्री पीस फाउंडेशनचे अध्यक्ष सुरजित बरुआ, सचिव मिलन पारेख, वर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष वासुमुदुमुरी वर्मा, पी. एन. स्वामी महाराज, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, पद्मश्री पुरस्कार विजेत्या सोमा घोष, समाजसेवक नवीन चंद्र, राहुल पाटील यांच्यासह राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार विजेते, लाभार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

 

Thursday, 17 September 2026

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का जन्मदिन; लोकभवन में रक्तदान शिविर आयोजित

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का जन्मदिन; लोकभवन में रक्तदान शिविर आयोजित

 

            मुंबई, 17 सितंबर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर राज्य सरकार द्वारा 17 सितंबर से 17 अक्टूबर 2026 तक सेवा संकल्प अभियानचलाया जा रहा है।     इस अभियान के अंतर्गत महाराष्ट्र लोकभवन में आयोजित रक्तदान शिविर का उद्घाटन आज सुबह महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने किया।

            यह रक्तदान शिविर इंडियन रेड क्रॉस सोसाइटी, मुंबई शाखा, पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्ट, नांदेड तथा इस्कॉन के अन्नामृत फाउंडेशन के सहयोग से आयोजित किया गया। इस अवसर पर लोकभवन के अधिकारियों एवं कर्मचारियों, राज्य रिजर्व पुलिस बल के जवानों तथा मुंबई और एसएनडीटी महिला विश्वविद्यालय के विद्यार्थियों ने रक्तदान किया।

            शिविर में इंडियन रेड क्रॉस सोसाइटी, महाराष्ट्र राज्य शाखा के अध्यक्ष होमी खुसरोखान, एसएनडीटी महिला विश्वविद्यालय के कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्ट के विश्वस्त डॉ. सुमेध चव्हाण, इस्कॉन के अन्नामृत फाउंडेशन के सदस्य गोरक्ष गंभीरे, जे. जे. अस्पताल के अधीक्षक डॉ. संजय सुरासे, चिकित्सक, पैरामेडिकल स्टाफ तथा रेड क्रॉस सोसाइटी, मुंबई के तकनीशियन उपस्थित थे।

000

Maharashtra Governor administers 'No To Drugs Pledge' to youth on PM Birthday

 Maharashtra Governor administers 'No To Drugs Pledge' to youth on PM Birthday

            Mumbai, 17 September : As part of the Seva Sankalp Abhiyan organised on the occasion of the birthday of Prime Minister Narendra Modi, the Governor of Maharashtra and Chancellor of universities Jishnu Dev Varma administered an Nasha Mukti pledge to the students of HSNC University at KC College Auditorium in Mumbai.

            The Students raised their hands and pledged to remain free from addiction and contribute towards building a drug-free India.

            The Governor launched the ‘Say No to Drugs’ portal developed by the University of Mumbai on the occasion.

 

            The ‘Nasha Mukt Yuva for Viksit Bharat’ programme was organised by HSNC University in collaboration with the Pandit Deendayal Upadhyay Sevabhavi Trust, Nanded, and Meghashrey Foundation.

 

            Solicitor and Head of HSNC University Adv. Anil Harish, Joint Secretary to the Governor S. Ramamoorthy, K. C. College In-charge Principal Tejashree Shanbhag,  President of the Meghashrey Foundation Seema Singh, Trustee of Pandit Deendayal Upadhyay Sevabhavi Trust Dr. Sumedh Chavan, actor Ravi Dubey, and Registrar of HSNC University Dr. Bhagwan Balani were present on the occasion. 

000


व्यसनाधीनता के विरुद्ध लड़ाई को राष्ट्रव्यापी बनाना आवश्यक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा · ‘ड्रग इज नॉट कूल, इट्स क्रूएल

 व्यसनाधीनता के विरुद्ध लड़ाई को राष्ट्रव्यापी बनाना आवश्यक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

· ‘ड्रग इज नॉट कूल, इट्स क्रूएल’


            मुंबई, 17 सितंबर : अमली पदार्थों का सेवन करके जीना कोई जीवन नहीं है। ‘ड्रग इज नॉट कूल, इट्स क्रूएल।’ किसी व्यसनाधीन व्यक्ति की मदद करना उसके जीवन में हस्तक्षेप करना नहीं, बल्कि उसे जीवन की ओर वापस लाने का प्रयास है। यह सोचकर कि हमारा उससे कोई संबंध नहीं है और उसे अपनी इच्छा के अनुसार जीने देना चाहिए, स्वार्थपूर्ण रवैया नहीं अपनाना चाहिए। व्यसनाधीनता की गंभीर चुनौती को देखते हुए इसके विरुद्ध लड़ाई को राष्ट्रव्यापी अभियान बनाना आवश्यक है। राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज युवाओं और विद्यार्थियों से अमली पदार्थों के आदी व्यक्तियों की मदद के लिए आगे आने का आह्वान किया।


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ के अंतर्गत राज्यपाल ने गुरुवार को एचएसएनसी विश्वविद्यालय के विद्यार्थियों को व्यसनमुक्ति की शपथ दिलाई। इस अवसर पर वे संबोधित कर रहे थे।


            के. सी. कॉलेज के सभागार तथा ओवल मैदान में आयोजित इस कार्यक्रम में विद्यार्थियों ने हाथ उठाकर व्यसनमुक्त रहने तथा व्यसनमुक्त भारत के निर्माण में अपना योगदान देने की शपथ ली। कार्यक्रम का आयोजन एचएसएनसी विश्वविद्यालय द्वारा पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्ट, नांदेड और मेघाश्रय फाउंडेशन के सहयोग से किया गया था

समाजातील वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेच्या समस्येला मागणी व पुरवठा अशा दोन बाजू आहेत

 समाजातील वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेच्या समस्येला मागणी व पुरवठा अशा दोन बाजू आहेत. पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व इतर शासकीय यंत्रणा कार्य करीत आहेत. परंतु मागणी होऊ नये याकरिता समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

 

            भारत ही सर्वाधिक युवा शक्ती असलेली सर्वात जुनी संस्कृती आहे.  अंमली पदार्थांच्या आव्हानामुळे आज कुटुंब  व समाज उद्ध्वस्त होत आहे. पूर्वी असलेली संयुक्त कुटुंब पद्धती राहिली नाही. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीला आधार देणारी नवी व्यवस्था समाजाला निर्माण करावी लागेल असे राज्यपालांनी सांगितले.  

व्यसनाधीनतेविरुद्ध लढा राष्ट्रव्यापी करणे आवश्यक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा · ड्रग इज नॉट कुल, इट्स क्रुएल

 व्यसनाधीनतेविरुद्ध लढा राष्ट्रव्यापी करणे आवश्यक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

·         ड्रग इज नॉट कुल, इट्स क्रुएल

 

            मुंबई, दि. १७ : अंमली पदार्थ घेऊन जगणे हे काही जीवन नाही.  'ड्रग इज नॉट कुल, इट्स क्रुएल'. व्यसनाधीन व्यक्तीला मदत करणे म्हणजे त्याच्या जीवनात लुडबुड करणे असे नसून ती त्याला मदत करणे आहे. व्यसनाधीन व्यक्तीशी आपला संबंध नाही; सबब त्याला वाटते तसे जगू द्यावे, अशी स्वार्थी भूमिका घेऊ नये असे  सांगताना अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी युवक व विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. व्यसनाधीनतेचे गंभीर आवाहन विचारात घेता त्याविरुद्ध लढा राष्ट्रव्यापी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यपालांनी एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीची प्रतिज्ञा दिली, त्यावेळी ते बोलत होते.  

 

            के. सी. महाविद्यालयाचे सभागृह तसेच ओव्हल मैदान येथे झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हात उंचावून व्यसनमुक्तीची तसेच व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी आपले योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे आयोजन एचएसएनसी विद्यापीठाने पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्ट, नांदेड व  मेघाश्रय फाउंडेशन यांच्या सहकार्याने केले होते. 

 

Featured post

Lakshvedhi