दिव्यांगांसाठी दया नव्हे, समान संधी निर्माण करणे समाजाची जबाबदारी
- राज्यपाल जिष्णु देव वर्मा
· सेवा संकल्प अभियानांतर्गत वर्मा फाउंडेशन व मैत्री पीस फाउंडेशनतर्फे व्हीलचेअर वितरण आणि राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार सोहळा
मुंबई, दि. १७ : दिव्यांग व्यक्तींकडे अपंगत्वाच्या नव्हे तर त्यांच्यातील क्षमता, प्रतिभा आणि दृढनिश्चयाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. त्यांच्याविषयी केवळ सहानुभूती व्यक्त न करता त्यांच्यासाठी समान संधी निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
लोकभवन सेवा संकल्प अभियानांतर्गत वर्मा फाउंडेशन आणि मैत्री पीस फाउंडेशन यांच्या वतीने वाय. बी. चव्हाण सभागृह येथे आयोजित व्हीलचेअर वितरण शिबीर आणि राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल वर्मा बोलत होते. यावेळी महामंडलेश्वर राजेश ओझा महाराज, मैत्री पीस फाउंडेशनचे अध्यक्ष सुरजित बरुआ, सचिव मिलन पारेख, वर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष वासुमुदुमुरी वर्मा, पी. एन. स्वामी महाराज, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, पद्मश्री पुरस्कार विजेत्या सोमा घोष, समाजसेवक नवीन चंद्र, राहुल पाटील यांच्यासह राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार विजेते, लाभार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment