समाजातील वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेच्या समस्येला मागणी व पुरवठा अशा दोन बाजू आहेत. पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व इतर शासकीय यंत्रणा कार्य करीत आहेत. परंतु मागणी होऊ नये याकरिता समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
भारत ही सर्वाधिक युवा शक्ती असलेली सर्वात जुनी संस्कृती आहे. अंमली पदार्थांच्या आव्हानामुळे आज कुटुंब व समाज उद्ध्वस्त होत आहे. पूर्वी असलेली संयुक्त कुटुंब पद्धती राहिली नाही. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीला आधार देणारी नवी व्यवस्था समाजाला निर्माण करावी लागेल असे राज्यपालांनी सांगितले.
No comments:
Post a Comment