Thursday, 2 July 2026

वारंवार पूरग्रस्त होणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाबाबत कोणताही विलंब होऊ नये

 मंत्री जाधव-पाटील म्हणाले की, वारंवार पूरग्रस्त होणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाबाबत कोणताही विलंब होऊ नये. ज्या गावांचे पूर्ण किंवा अंशतः पुनर्वसन आवश्यक आहे, त्या गावांचे प्रस्ताव शासनाच्या निर्धारित निकषांनुसार तयार करावेत. तसेच ज्या ठिकाणी संरक्षण भिंती, बंधारे किंवा इतर पूरप्रतिबंधक उपाययोजना आवश्यक आहेत, त्या उपाययोजनांचेही स्वतंत्र प्रस्ताव सादर करावेत. बैठकीत पूरप्रवण गावांसाठी ब्ल्यू लाईन, रेड लाईन  निश्चित करण्याच्या कामाला प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले. पुनर्वसनाचे प्रस्ताव तज्ज्ञ समितीसमोर सादर करण्यासाठी ही प्रक्रिया आहे. सर्वेक्षण, आवश्यक कागदपत्रे आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पुनर्वसनाची प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबविण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

 

बैठकीत राज्य शासनाच्या पुनर्वसन धोरणानुसार आपत्तीप्रवण गावांचे प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत शासनाकडे सादर करण्यात येतील. त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमिती तसेच तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती 

बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांचा आढावा

 बैठकीत बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये  बीड जिल्ह्यातील ६४, परभणी जिल्ह्यातील ५१ आणि जालना जिल्ह्यातील ३४ अशा एकूण १४९ गावांबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. या गावांमध्ये १९९२, २००६ आणि २०२५ मध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी सुधारित प्रस्ताव सादर करा

 गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी सुधारित  प्रस्ताव सादर करा

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबई, दि. १  : गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांतील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी  संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

 

गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस   विधानसभा सदस्य विजयसिंह पंडित, हिकमत उढाण, राजेश विटेकर,  विभागीय आयुक्त,  तसेच बीड, परभणी आणि जालना जिल्हा अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बंदरांची क्षमता लक्षात

 बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बंदरांची क्षमता लक्षात घेता राज्यातील बंदरांचा आधुनिक पद्धतीने विकास करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. देशातील आणि जगातील यशस्वी बंदरांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यातील सर्वोत्तम पद्धती महाराष्ट्रात राबविण्यात येतील. यामुळे राज्यातील सागरी व्यापाराला गती मिळेल, गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

 

मुंद्रा पोर्टच्या अभ्यास दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील बंदर विकासासाठी नवीन दिशा मिळणार असून, आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांच्या माध्यमातून राज्यातील बंदरांना अधिक स्पर्धात्मक बनविण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्रातील बंदरे अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जागतिक दर्जाची करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना, आधुनिक

 महाराष्ट्रातील बंदरे अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जागतिक दर्जाची करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना, आधुनिक उपकरणांचा वापर, लॉजिस्टिक्स साखळी बळकट करणे, मालवाहतुकीची क्षमता वाढविणे आणि बंदरांशी संलग्न औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या विविध बाबींवरही विचारविनिमय झाला.

 

बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बंदरांची क्षमता लक्षात घेता राज्यातील बंदरांचा आधुनिक पद्धतीने विकास करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. देशातील आणि जगातील यशस्वी बंदरांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यातील सर्वोत्तम पद्धती महाराष्ट्रात राबविण्यात येतील. यामुळे राज्यातील सागरी व्यापाराला गती मिळेल, गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

 

मुंद्रा पोर्टच्या अभ्यास दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील बंदर विकासासाठी नवीन दिशा मिळणार असून, आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांच्या माध्यमातून राज्यातील बंदरांना अधिक स्पर्धात्मक बनविण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार

 मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा

महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार

बंदरे मंत्री नितेश राणे

·         मुंद्रा पोर्टची पाहणी व महाराष्ट्रातील बंदरे विकासाबाबत चर्चा

 

मुंबई), दि. १  : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक व्यावसायिक बंदरांपैकी एक असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टला भेट देऊन तेथील जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक बंदर व्यवस्थापन आणि पायाभूत विकासकामांची पाहणी करुन माहिती घेतली. महाराष्ट्रातील बंदरांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना अधिक सक्षम, स्पर्धात्मक व आधुनिक बनविण्यासाठी मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार असल्याचे बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

 

या दौऱ्यात मंत्री नितेश राणे यांनी बंदरातील अत्याधुनिक कंटेनर हाताळणी व्यवस्था, यांत्रिकीकरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, मालवाहतूक व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स नेटवर्क, साठवण सुविधा, जहाजांच्या जलद हालचालीसाठी विकसित करण्यात आलेली यंत्रणा तसेच विविध पायाभूत विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. बंदरातील कार्यक्षम नियोजन, वेगवान सेवा आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापनामुळे मुंद्रा पोर्टने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.

 

या भेटीदरम्यान अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक करण गौतम अदानी उपस्थित होते. त्यांच्यासमवेत बंदर विकास, सागरी वाहतूक, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, खासगी गुंतवणुकीच्या संधी तसेच भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये बंदर क्षेत्राची वाढती भूमिका यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.


वाडी नगरपरिषदेच्या सांडपाण्याचा प्रश्न ३० ऑगस्टपर्यंत मार्गी लावणार

 वाडी नगरपरिषदेच्या सांडपाण्याचा प्रश्न ३० ऑगस्टपर्यंत मार्गी लावणार

– पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबई, दि. १ : नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेच्या हद्दीतील अंबाझरी तलावात प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याच्या प्रश्नावर राज्य शासनाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या असून, ११ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. त्यानंतर प्रक्रिया केलेले पाणीच तलावात सोडण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत सदस्य परिणय फुके यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य संजय भेंडे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

पर्यावरण मंत्री मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) प्रमुख काम प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित संस्थांना नोटिसा देणे व पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी करणे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उपलब्ध करून देण्याचा अधिकार मंडळाकडे नाहीत. त्यामुळे नगरपालिकांनी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे ही त्यांची जबाबदारी आहे.

वाडी नगरपरिषदेच्या ११ एमएलडी क्षमतेच्या एसटीपीचे सुमारे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते तलावात सोडले जाईल. त्यामुळे तलावातील प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळेल, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला.

तलावातील जलपर्णीच्या समस्येचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, घरगुती सांडपाण्यातील फॉस्फेटमुळे जलपर्णी वाढते. सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था सुरू झाल्यानंतर या समस्येवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होईल. पर्यावरण विभागाच्या विविध योजनांसाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. नदी पुनरुज्जीवन, तलाव संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून, उपलब्ध निधीनुसार ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील.

हिंगणा एमआयडीसी तलावातील पाणी प्रक्रिया करून उद्योगांना पुरवत असल्याची माहिती देत त्यांनी सांगितले की, सध्या येणारे पाणी अत्यंत प्रदूषित असल्याने त्यावर प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे नगरपरिषदांची स्वतःची सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था सक्षम होणे अत्यावश्यक आहे.

प्रदूषण नियंत्रण ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून नगरविकास विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरसह राज्यातील नद्या, तलाव आणि अन्य जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Featured post

Lakshvedhi