Thursday, 2 July 2026

मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार

 मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा

महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार

बंदरे मंत्री नितेश राणे

·         मुंद्रा पोर्टची पाहणी व महाराष्ट्रातील बंदरे विकासाबाबत चर्चा

 

मुंबई), दि. १  : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक व्यावसायिक बंदरांपैकी एक असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टला भेट देऊन तेथील जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक बंदर व्यवस्थापन आणि पायाभूत विकासकामांची पाहणी करुन माहिती घेतली. महाराष्ट्रातील बंदरांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना अधिक सक्षम, स्पर्धात्मक व आधुनिक बनविण्यासाठी मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार असल्याचे बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

 

या दौऱ्यात मंत्री नितेश राणे यांनी बंदरातील अत्याधुनिक कंटेनर हाताळणी व्यवस्था, यांत्रिकीकरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, मालवाहतूक व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स नेटवर्क, साठवण सुविधा, जहाजांच्या जलद हालचालीसाठी विकसित करण्यात आलेली यंत्रणा तसेच विविध पायाभूत विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. बंदरातील कार्यक्षम नियोजन, वेगवान सेवा आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापनामुळे मुंद्रा पोर्टने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.

 

या भेटीदरम्यान अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक करण गौतम अदानी उपस्थित होते. त्यांच्यासमवेत बंदर विकास, सागरी वाहतूक, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, खासगी गुंतवणुकीच्या संधी तसेच भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये बंदर क्षेत्राची वाढती भूमिका यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi