Thursday, 2 July 2026

महाराष्ट्रातील बंदरे अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जागतिक दर्जाची करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना, आधुनिक

 महाराष्ट्रातील बंदरे अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जागतिक दर्जाची करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना, आधुनिक उपकरणांचा वापर, लॉजिस्टिक्स साखळी बळकट करणे, मालवाहतुकीची क्षमता वाढविणे आणि बंदरांशी संलग्न औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या विविध बाबींवरही विचारविनिमय झाला.

 

बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बंदरांची क्षमता लक्षात घेता राज्यातील बंदरांचा आधुनिक पद्धतीने विकास करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. देशातील आणि जगातील यशस्वी बंदरांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यातील सर्वोत्तम पद्धती महाराष्ट्रात राबविण्यात येतील. यामुळे राज्यातील सागरी व्यापाराला गती मिळेल, गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

 

मुंद्रा पोर्टच्या अभ्यास दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील बंदर विकासासाठी नवीन दिशा मिळणार असून, आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांच्या माध्यमातून राज्यातील बंदरांना अधिक स्पर्धात्मक बनविण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi