Monday, 11 May 2026

ड्रोन शो या अभिनव उपक्रमांतून

 ड्रोन शो या अभिनव उपक्रमांतून  नागरिकांना आकाशात बाबासाहेबांच्या कार्याचे नेत्रदीपक दर्शन घडले. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर देशभरासह जागतिक स्तरावर होत असूनअशा अभिनव उपक्रमांतून नव्या पिढीपर्यंत त्यांचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

          या ड्रोन शो-द्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले. सुमारे २००० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात साकारण्यात आलेली प्रकाशचित्रे प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

या प्रकाशचित्रांमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पे प्रभावीपणे उलगडण्यात आले. तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारी विलोभनीय दृश्ये साकारण्यात आली. महामानवाने घडविलेल्या सामाजिक क्रांतीचा प्रेरणादायी प्रवासही या ड्रोन शोमधून जिवंत करण्यात आला.

यावेळी गायिका वैशाली माडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दया, क्षमा आणि शांतीचे मूल्य

 सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणालेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दयाक्षमा आणि शांतीचे मूल्य दिले. समानतासमान संधी आणि सामाजिक जबाबदारी यांवर आधारित त्यांचा विचार आजही मार्गदर्शक ठरत आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली त्यांच्या तत्त्वज्ञानातच दडलेली आहे. भारतीय संविधान हे जगासाठी मार्गदर्शक ठरणारे असूनत्यावर उभारलेली लोकशाही व्यवस्थाप्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व्यवस्था ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आकाशात उजळला महामानवाच्या तेजाचा प्रकाश ड्रोनच्या भव्य रोषणाईतून

 आकाशात उजळला महामानवाच्या तेजाचा प्रकाश

ड्रोनच्या भव्य रोषणाईतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच

सर्वसमावेशक विकास शक्य

-         मंत्री संजय शिरसाट

 

मुंबईदि. १० : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाच्या प्रगतीचे शिल्पकार आहेत. शिक्षणसमानता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले असूनत्यांच्या विचारांचा प्रभाव आजही प्रत्येकाच्या जीवनात जाणवतो. समाजातील पुढील पिढीपर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त शिवाजी पार्क दादर येथे प्रथमच ड्रोन शो व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

३५० सिंधी बांधवांना पट्टे वाटप

 ३५० सिंधी बांधवांना पट्टे वाटप

 

             भारताच्या फाळणीनंतर पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या सिंधी विस्थापितांचे नागपूर जिल्ह्यातील खामलामेकोसाबाग व जरीपटका या भागात पुनर्वसन करण्यात आले. या तीन वसाहतींना अधिकृत विस्थापित वसाहतीचा दर्जा देण्यात आला. अनेक विस्थापित कुटुंबे मागील 70 -75 वर्षांपासून येथे वास्तव्यास असून त्यांनी नागपूरच्या आर्थिकसामाजिक व व्यापारी विकासात मोठे योगदान दिले. आज 350 सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारा जणांना प्रातिनिधिक स्वरूपात पट्टे वाटप करण्यात आले.

देशाच्या फाळणीनंतर या समाजाला घर, शेती, व्यापार सोडून विस्थापित होऊन

 मुख्यमंत्री पुढे म्हणालेदेशाच्या फाळणीनंतर या समाजाला घरशेतीव्यापार सोडून विस्थापित होऊन भारतात यावे लागले. त्याचप्रमाणे अनेक वर्ष या समाज बांधवांना निर्वासितांच्या शिबिरामध्ये घालवावी लागली. समाजाने आपले दुःख हे  संघर्षाचे शस्त्र बनवले. आज हा समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर असून देशाच्या विकासात अत्यंत मोलाचे योगदान देत आहे.

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रदान करण्याचे देशभरात अभियान राबवले गेले. सिंधी बांधव वास्तव्यास असलेल्या जमिनी अतिक्रमण ठरत होत्या. त्यामुळे सिंधी बांधवांना मालकी पट्टे मिळावेअशी मागणी सुरू होती. संधी मिळताच आम्ही या प्रश्नावर तोडगा काढला आणि सिंधी बांधवांना वर्ग एकच्या शंभर टक्के मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान

  

सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंधी समाज बांधवांना मालकी पट्ट्यांचे वाटप,

समाजातील नगरसेवकांचा सत्कार

 

     नागपूरदि. १०: निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या  सिंधी समाजाने शून्यापासून सुरुवात केली. आज देशाच्या व्यापार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रामध्ये हा समाज आघाडीवर असून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेअसे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

     विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या वतीने जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमात सिंधी बांधवांना मालकी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. तसेचसमाजातील नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर भगवानदास सवनानीआमदार कुमार आयलानीअमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानीजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादभारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय संरक्षक घनश्याम कुकरेजासिंधी विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनकी रूघवानीसंयोजक वीरेंद्र कुकरेजासचिव पि.टी. दारा आदी उपस्थित होते. यावेळी ३६ नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यापैकी १२ नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात करण्यात आला.

Sunday, 10 May 2026

सिंधुदुर्गतील मूठ गाव राज्यात स्वगणनेत प्रथम ·

 सिंधुदुर्गतील मूठ गाव राज्यात स्वगणनेत प्रथम

·         प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून यश

राज्यातील इतर गावांनाही आदर्श घ्यावा

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा जे डांगे

 

मुंबईदि. ८ : स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात पहिले पूर्ण स्वगणना करणारे गाव म्हणून मान पटकावला आहे.

 

राज्यातील इतर गावांनीही मूठ गावाचा आदर्श घेऊन स्वगणना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावीअसे आवाहन श्रीमती डांगे यांनी केले.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गावातील सर्व कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात यश आले.

 

मूठ गावात एकूण ३६ घरे आणि ४३ कुटुंबांचा समावेश असून गावाची लोकसंख्या १४४ आहे. गावातील सर्व कुटुंबांनी स्वगणना प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत माहिती अचूकपणे सादर केली.

 

या यशामागे तहसीलदार ओंकार ओतारी यांचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले. तसेच नायब तहसीलदारमंडळ अधिकारी आणि सर्व तलाठी यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे ही मोहीम वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण झाली. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याची भूमिका निभावली.

 

मूठ गावाची ही कामगिरी जिल्ह्यासाठी प्रेरणादायी व राज्यासाठीही ठरली असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य होऊ शकतेहे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Featured post

Lakshvedhi