Monday, 11 May 2026

ड्रोन शो या अभिनव उपक्रमांतून

 ड्रोन शो या अभिनव उपक्रमांतून  नागरिकांना आकाशात बाबासाहेबांच्या कार्याचे नेत्रदीपक दर्शन घडले. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर देशभरासह जागतिक स्तरावर होत असून, अशा अभिनव उपक्रमांतून नव्या पिढीपर्यंत त्यांचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

          या ड्रोन शो-द्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले. सुमारे २००० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात साकारण्यात आलेली प्रकाशचित्रे प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

या प्रकाशचित्रांमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पे प्रभावीपणे उलगडण्यात आले. तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारी विलोभनीय दृश्ये साकारण्यात आली. महामानवाने घडविलेल्या सामाजिक क्रांतीचा प्रेरणादायी प्रवासही या ड्रोन शोमधून जिवंत करण्यात आला.

यावेळी गायिका वैशाली माडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi