Monday, 11 May 2026

सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान

  

सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंधी समाज बांधवांना मालकी पट्ट्यांचे वाटप,

समाजातील नगरसेवकांचा सत्कार

 

     नागपूर, दि. १०: निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या  सिंधी समाजाने शून्यापासून सुरुवात केली. आज देशाच्या व्यापार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रामध्ये हा समाज आघाडीवर असून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

     विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या वतीने जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमात सिंधी बांधवांना मालकी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. तसेच, समाजातील नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर भगवानदास सवनानी, आमदार कुमार आयलानी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय संरक्षक घनश्याम कुकरेजा, सिंधी विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनकी रूघवानी, संयोजक वीरेंद्र कुकरेजा, सचिव पि.टी. दारा आदी उपस्थित होते. यावेळी ३६ नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यापैकी १२ नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi