Monday, 11 May 2026

आकाशात उजळला महामानवाच्या तेजाचा प्रकाश ड्रोनच्या भव्य रोषणाईतून

 आकाशात उजळला महामानवाच्या तेजाचा प्रकाश

ड्रोनच्या भव्य रोषणाईतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच

सर्वसमावेशक विकास शक्य

-         मंत्री संजय शिरसाट

 

मुंबई, दि. १० : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाच्या प्रगतीचे शिल्पकार आहेत. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले असून, त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही प्रत्येकाच्या जीवनात जाणवतो. समाजातील पुढील पिढीपर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त शिवाजी पार्क दादर येथे प्रथमच ड्रोन शो व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi