एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांसाठी शासकीय योजनांची माहिती
एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार
- राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि. २३ : माहिती हे सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हे आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे महत्त्वाचे माध्यम आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना विविध शासकीय योजना, सुविधा आणि संधींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे स्वदेशी शोध संस्थानचे 'एमएसएस' ॲप उपयुक्त ठरेल. विशेषतः हे ॲप मराठी भाषेतही उपलब्ध असल्याने राज्यातील उद्योजकांना त्याचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
स्वदेशी शोध संस्थानच्या मुंबई चॅप्टरतर्फे विकसित करण्यात आलेल्या 'एमएसएस' ॲपचे लोकार्पण राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, स्वदेशी शोध संस्थानच्या मुंबई चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. आसावरी बापट, प्रमुख डॉ. आर. श्रीनिवासन अय्यंगार, ॲप विकास पथकाचे सदस्य, राजलक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नईचे प्रतिनिधी, स्वदेशी शोध संस्थानचे सदस्य तसेच विविध शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment