ऊर्जा क्षेत्रातील कामांचा उल्लेख करताना त्यांनी ‘सौभाग्य’ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती दिली. ज्या गावांमध्ये शंभर वर्षांहून अधिक काळ वीजजोडणी नव्हती, अशा गावांपर्यंत वीज पोहोचविण्यात आली. काही ठिकाणी वीज वितरण जाळ्याद्वारे, तर दुर्गम भागांत सौर आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात आला.
त्रिपुरातील आर्थिक विकासाबाबत बोलताना राज्यपाल म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात राज्यात सुमारे ३० बाह्य सहाय्यित प्रकल्प (ईएपी) सुरू करण्यात आले. यापूर्वी राज्यात जपानच्या जेआयसीए आणि इंडो-जर्मन असे केवळ दोन प्रकल्प होते. लहान राज्यासाठी सुमारे ३० प्रकल्प मिळणे ही मोठी बाब होती. आदिवासी कल्याणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने विशेष प्रकल्पही राबविण्यात आला. या प्रकल्पातून दळणवळण आणि उपजीविकेच्या साधनांच्या विकासावर भर देण्यात आला.
No comments:
Post a Comment