Monday, 23 November 2026

स्वदेशी संशोधनातून आत्मनिर्भरतेला चालना मिळेल

 स्वदेशी संशोधनातून आत्मनिर्भरतेला चालना मिळेल

एमएसएमई क्षेत्र आर्थिक विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करते. कोविडच्या काळात या क्षेत्राला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना आवश्यक माहिती व सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविण्यासाठी एमएसएमई क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

 

शिक्षणाप्रमाणेच माहितीमुळेही व्यक्ती आणि समाजाचे सक्षमीकरण होते. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असून, त्यांची माहिती सर्वसामान्य उद्योजकांपर्यंत पोहोचविणे हे मोठे आव्हान आहे. या ॲपच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती स्थानिक भाषेत उपलब्ध होणार असल्याने उद्योजकांना त्याचा लाभ घेता येईल. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान मोठे असून, त्यात एमएसएमई क्षेत्राची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. 'स्वदेशी'च्या विचारातूनच आत्मनिर्भरतेचा मार्ग प्रशस्त होतो. आपल्या देशातील ज्ञान, संसाधने आणि क्षमतांचा उपयोग करून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi