Sunday, 1 November 2026

राज्यातील पहिले ग्रीन डेटा सेंटर उजनी जलाशयावर

 राज्यातील पहिले ग्रीन डेटा सेंटर उजनी जलाशयावर

  • औद्योगिक विकासाला आणि रोजगार निर्मितीला मिळणार पाठबळ
  • शेतकरी हिताचा पर्यावरण पूरक प्रकल्प

 

 मुंबई,  दि. ३० : महाराष्ट्रात स्वच्छ ऊर्जा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणावरील रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यात येत असून, याच व्यापक विकास दृष्टीतून उजनी जलाशय परिसरात प्रस्तावित भव्य डेटा सेंटर, तरंगती सौर ऊर्जा, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आणि आर्टिफिशियल इंटेलिजियन्स प्रकल्प कार्यान्वित होत आहे. महाराष्ट्रातील पहिला ग्रीन डेटा सेंटर प्रकल्प पर्यावरणाचे रक्षण करणारा रोजगार निर्मितीला चालना देणारा आणि सिंचनाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

 

२,००० मेगावॅट स्वच्छ ऊर्जा आणि आधुनिक 'एआय डेटा सेंटर'

या प्रस्‍तावित प्रकल्पातून उजनी येथे सुमारे २,००० मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार असून, सौर ऊर्जेच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी १,८०० मेगावॅट क्षमतेची 'बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम' उभारली जाईल, ज्यामुळे ग्रीड स्थिरतेस मदत होईल. टप्प्याटप्प्याने १,४०० मेगावॅट क्षमतेचे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर' विकसित करण्‍याचे उदिष्ट आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi