सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सातिवलीच्या गरम पाण्याच्या कुंडाजवळील महादेव मंदिरात भगवा ध्वजाचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते ध्वजारोहण..!
# हिंदुत्वाची परंपरा आणि धार्मिक संस्कृतीचा सन्मान; सातिवलीत भगवा ध्वज फडकवत ; धार्मिक वातावरण
सातिवली / पालघर (प्रतिनिधी) – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे औचित्य साधून बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते सातिवली येथील प्रसिद्ध गरम पाण्याच्या कुंडाजवळील श्री महादेव मंदिरात दर्शन घेऊन भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या धार्मिक उपक्रमातून हिंदू धर्माच्या प्राचीन परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यात आला.
भगवा ध्वज हा हिंदू धर्मातील त्याग, तपस्या, शौर्य, अध्यात्म आणि सनातन संस्कृतीचे प्रतीक मानला जातो. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक पर्वाच्या पार्श्वभूमीवर सातिवली येथील महादेव मंदिर परिसरात भगवा ध्वज फडकविण्याच्या उपक्रमाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. हिंदुत्वाच्या सांस्कृतिक परंपरांशी असलेली बांधिलकी जपत आमदार विलास तरे यांनी या ध्वजारोहण सोहळ्यात सहभाग नोंदविला. धार्मिक स्थळांचे पावित्र्य, ऐतिहासिक वारसा आणि हिंदू संस्कृतीच्या परंपरांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. सातिवली येथील गरम पाण्याचे कुंड आणि महादेव मंदिर हे परिसरातील धार्मिक श्रद्धेशी जोडलेले ठिकाण आहे. अशा पवित्र स्थळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने भगवा ध्वज फडकविण्यात आल्याने या सोहळ्याला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले. विकासकामांसोबतच धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनालाही महत्त्व देणारे आमदार विलास तरे यांचा या उपक्रमातील सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. हिंदुत्वाच्या विचारांशी निगडित धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग हा स्थानिक परंपरांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या भगव्या ध्वजारोहण सोहळ्यामुळे सातिवली येथील महादेव मंदिर परिसरात धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेला भगवा ध्वज दिमाखात फडकला.
या शुभप्रसंगी आमदार विलास तरे, माजी आमदार आमित घोडा, ज्येष्ठ नेते प्रभाकर विचारे, माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत गरुडा, माजी सभापती संतोष बुकले, कृषी उत्पन्न बाजात समिती माजी उप सभापती दिलीप मरले, सातिवली ग्रामपंचायत सरपंच तथा सातिवली मंदिर ट्रस्ट अध्यक्ष कृष्णा जाधव, उपसरपंच गंगाराम करपट, सुभाष लहांगे, रमेश डवला, राहुल श्रावणे, संदीप उराडे, रमेश पाटील, आकाश जाधव, रमेश शेळके, जयेश लहांगे, गणपत लोहार, नाना सांबरे, सुलक्षण पाटील व मंदिर समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
--
L



No comments:
Post a Comment