Wednesday, 14 October 2026

बाप्पाचा कट्टा’ २९ ऑक्टोबरपासून गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक उत्सवाला

 बाप्पाचा कट्टा’ २९ ऑक्टोबरपासून


गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक उत्सवाला वर्षभराच्या लोकसहभागाची जोड देण्यासाठी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदयाच्या वेळी वांद्रे येथील कार्टर रोडवर ‘बाप्पाचा कट्टा’ हा उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. या उपक्रमात हजारो नागरिक सहभागी होऊन सहा फूट उंचीच्या मोदकाला रंगविणार आहेत

या उपक्रमाच्या निमंत्रणासाठी आणि नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी १९ ऑक्टोबरपासून प्रसिद्धी उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. २९ ऑक्टोबरच्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठी कुटुंबांमध्ये सांस्कृतिक भावबंध दृढ करण्याचाही या उपक्रमाचा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi